क्राइम
सारखणी येथील मटका अड्यावर सिंदखेड पोलीसांंची धाड ; 610 रूपयाच्या किरकोळ रकमेसह मोटर सायकल जप्त…..
सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारखणीसह वाई बाजारात 'मटका जुगाराचे' पुनरागमन...!! सिंदखेड पोलीसांकडून धाडसी कारवायांची गरज...!!

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद असलेल्या मटका जूगाराचे धडाकेबाड पुनरागमन झाले असून याची चाहूल लागल्याने सारखणी येथील मटका अड्यावर सिंदखेड पोलीसांंची धाड टाकून तब्बल 610 रूपयाची अगदी किरकोळ रोकड हस्तगत केल्याची माहीती सिंदखेड पोलीसांत तिंघावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून दिसून येत आहे…
काल दि. २६ फेब्रुवारी रोजी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनवट तालुक्यातील सारखणी येथील दत्तकृपा हॉटेलच्या पाठीमागच्या मोकळ्या शिवारात काही मटकाबुकींकडून मटका जुगार खेळल्या व खेळवल्या जात असल्याची माहीती सिंदखेड पोलीसांना मिळाली. त्यावेळी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्यासह ना.पो.कॉ. कोंडापलकूलवार, पो. कॉ. संघरत्न सोनसळे, संजय शेंडे, चालक किशन राठोड यांच्या पथकाने तेथे धाड टाकली… यावेळी ६१० रूपयाच्या हास्यास्पद रोकडीसह मटका खेळाचे साहित्य व काळ्या रंगाची पल्सर दुचाकी असा एकूण ३०६१० रूपयाचा मुद्देमाल पोलीसांना मिळून आला....
याप्रकरणी सतिष केशवराव कोंडापलकूलवार यांच्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९/२०२५ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १२ अ व ४९ अन्वये संदेश उत्तम राठोड, निखिल सतराम पवार व शंकर विठ्ठल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपींना अटक कल्यानंतर नोटीस देवून सोडले असल्याचे सिंदखेड पोलीसांकडून सांगण्यात आले आहे….

