नोकरी संदर्भ
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना ‘DNE – १३६’ ची विशेष बैठक संपन्न…
"संघटनेच्या रिक्त पदांवर नवीन पदाधिका-यांची नेमणूक"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर, प्रतिनिधी
पंचायत समिती माहूर येथील स्व. वसंतराव नाईक सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना डिएनई -136 च्या वतीने विशेष बैठक काल दि. १५ रोजी पार पडली असून संघटनेच्या या विशेष बैठकीत रिक्त पदांवर चर्चा होवून नवीन पदाधिका-यांची निवड करण्यात आली…
काल दि. १५ जानेवारी रोजी माहूर पंचायत समितीच्या स्व. वसंतरावजी नाईक सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना डि.एन. ई १३६ चे माहूर शाखा अध्यक्ष व्ही. एस. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस राज्य संघटना काउँसलर प्रेम गुट्टे तर प्रमुख पाहूणे म्हणून ग्राम पंचायत अधिकारी वेणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती…
दरम्यान संघटनेच्या विशेष बैठकीत रिक्त पदांवर चर्चा होवून रिक्त असलेल्या सचिव पदावर राजू सरोदे तर महिला उपाध्यक्ष पदी वर्षाताई लंबे, प्रसिद्धी प्रमुख एनलोड व सदस्यपदी शिवाजी गावंडे यांची निवड करण्यात आली…. यावेळी संघटनेच्या कार्यकारीणी पदाधिका-यांसह सभासद अतुल पाटील गांवडे, बी. बी. कासदेकर, संतोष मारकड, अमोल कोडलकर, डि. एस. पवार, शिवाजी गावंडे, व्ही. बी. जावरकर, व्ही. एन. पाईकराव, श्री अमोल टिपरसे, वर्षाताई लंबे, दिक्षाताई नरवाडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते…
या विशेष सभेचे सुत्रसंचालन संघटनेचे मानद अध्यक्ष दिलीप पवार यांनी तर आभार प्रदर्शन संतोष मारकड यांनी केले…. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल गावंडे यांच्यासह बी. बी.कसदेकर, अमोल कांडलकर, अमोल टिप्परसे, विलास पाईकराव आदींनी परिश्रम घेतले….