ईतर
सिंदखेड पोलीसांच्या मुखातून बंद असलेले अवैध धंदे वाई बाजारात प्रत्यक्षात सुरूच….
"अवैध व्यवसायासंदर्भात पोलीसांची चालबाजी की अतिआत्मविश्वास याबाबत चर्चांना उधान.!!'
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
मागील काही महिण्यांपुर्वी सिंदखेड पोलीस ठाण्यात रूजू झालेल्या ठाणेदारांंनी रूजू होताच अवैध धंद्यांवर बसवलेल्या चपराकीने काही काळ अवैध धंद्यांना ब्रेक बसल्यानंतर पुन्हा एकदा वाई बाजारात मटका-गुटखा यासह बहुतांश अवैैध धंद्यांनी डोके वर काढले असून सिंदखेड पोलीसांच्या मुखातून मात्र सर्व अवैध धंदे बंद असलेल्याची बतावणी होत असल्याने अवैध व्यवसायासंदर्भात सिंदखेड पोलीसांची ही चालबाजी की पोलीसांचा अतिआत्मविश्वास याबाबतच्या रंजक चर्चांना उधान आल्याचे दिसून येत आहे…
दरम्यान अपेक्षेप्रमाणे अवैध धंदेधारक मंडळी पोलीसांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे सर्वश्रुत अजून राजकीय तसेच व्यावसायिक दृष्ट्या माहूर तालुक्यातील अत्यंत महत्वाचे ठिकाण असलेल्या वाई बाजार येथील बाजारपेठेत सध्या पोलीसांच्या दृष्टीने बंद असलेले अवैध व्यवसाय प्रत्यक्षात मात्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे… तथापि, पोलीसांच्या नजरेतून बंद असलेले अवैध व्यवसाय प्रत्यक्षात वाई बाजारच्या मुख्य चौकात बसून बिनदिक्कतपणे सुरू असल्याने हे व्यवसाय सिंदखेड पोलीसांंच्या दृष्टीपथास येत नाहीत का..? असा यक्षप्रश्न वाई बाजारकरांना भेडसावत असून पोलीसांकडून बंद असल्याची बतावणी केले जाणारे व्यवसाय प्रत्यक्षात मात्र जोमाने सुरू असल्याने सिंदखेड पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना.. “हप्तेखोरीसाठी ही सिंदखेड पोलीसांची चालबाजी..? की अतिआत्मविश्वास..?? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत…
“विशेष म्हणजे वाई बाजारातील मुख्य चौकात सुरू असलेला मटका व्यवसाय व राजरोसपणे दुचाकींवरून केल्या जाणा-या गुटख्याच्या पुरवठ्यासह अनेक अवैध व्यवसायासाठी जणू सरकारी परवानाच मिळाल्याच्या तो-यात अवैध धंदेवाले वावरत आहेत. तर येथील एका बार अँड रेस्टॉरंट मध्ये नित्यनियमाने रेतीवाल्यांसह अवैध धंदेधारकांच्या बैठकांचे सोपस्कार पार पाडले जात असल्याची चर्चा आहे…यात पोलीसांपासून ते महसूली अधिका-यांपर्यंतची आवक-जावक असल्याची गोपनीय सुत्रांची माहिती आहे.. अशात सरकारी कर्मचारी व अवैध धंदेवाल्यांच्या गोपनीय बैठकांचे रहस्य नेमके काय हे सर्वसामान्यांना न कळणारी बाब निश्चितच नसून प्रशासनाशी थेट संबंध घडवून येत असल्याने अवैध व्यवसायासाठी जणू ‘ग्रीन झोन’ म्हणून उदयास आलेल्या वाई बाजार येथील बाजारपेठेत सिंदखेड पोलीसांच्या मुखातून बंद असलेले अवैध धंदे जसेच्या तसे सुरू असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीचे धिंडवडे वाई बाजारच्या मुख्य चौकात निघताना दिसून येत आहेत.. त्यामुळे वाई बाजारसह परिसरातील अंजनखेड, हरडफ, बोंडगव्हाण, मदनापूर, सारखणी, सेलू, करंजी येथे बिनदिक्कत व राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून अनेकांचे खिसे कापणारा हा गोरखधंदा बंद करावा अशी मागणी जनमानसातून होत आहे..