माहूर येथील नामवंत वकील विशाल भवरे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड….
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर, प्रतिनिधी
माहूर न्यायालयात मागील अनेक वर्षांपासून कायदेशीर वकीली व्यवसायात पारंगत असलेले अँड.
विशाल भवरे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल माहूर तालुका वकील संघासह मित्र परिवार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच पत्रकार बांधवांकडून अभिनंदन केल्या जात आहे…
भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या विधी व कार्य विभागाच्या उप विधीक सल्लागार सविता रानी सिंगल यांच्याा डिजीटल स्वाक्षरीने दि. ९ जानेवारी २०२५ रोजी निर्गमित झालेल्या या पत्राद्वारे महाराष्ट्र को नोटेरी अधिनियम 1952 (1952 का 53) नुसार विधिज्ञ विशाल भवरे यांची नियुक्ती केली आहे.. त्यांच्या नोटरी पदी झालेल्या निवडीमुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:स्वास टाकला असून मागील काही वर्षांपासून नोटरीच्या नावाखाली होत असलेल्या पिळवणूकीला आता आळा बसेल अशी भावनाही व्यक्त केली जात आहे….
“विशेष म्हणजे विधी व न्याय विभागाचे परिपत्रक क्रमांक ‘विवन्यावि-2012/नोटरी / ई शाखा दिनांक १३/०४/२०१२ नुसार’…..
1) रुपये १०००० पर्यंतचा करार नोंदवण्यासाठी (नोटरी करणेसाठी) रुपये ३५ /- ₹…
2) दहा हजार ते २५००० साठी रुपये ७५/-₹
3) २५००० ते ५०००० साठी रुपये १००/-₹
4) ५०००० चे पुढे जास्तीत जास्त रुपये १५०/-₹ तर… साक्षांकित प्रती साठी रुपये ५/- प्रती पान (कमीतकमी रुपये १०/-) याप्रमाणे शुल्क आकारण्याचे नियम शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून बंधनकारक केलेले आहेत… त्यामुळे वरील प्रमाणे कमीत कमी रुपये ३५/- ते जास्तीत जास्त रुपये १५०/- एवढाच आकार नोटरी घेऊ शकतात….
……परंतू मागील काही वर्षांपासून माहूर शहरात गरजूंची गरज लक्षात घेवून साध्या नोटरीसाठीही कमीत कमी 200/-₹ शुल्क आकारले जात आसल्याचे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही… त्यामुळे किमान यापुढे तरी सर्वसामांन्यांची पिळवणूक होवू नये अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य बाळगून आहेत…..