ईतर

माजी आमदार प्रदिप नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दु:खद निधन….

"किनवट माहूर तालुक्यावर शोककळा ; संयमी नेता हरवला..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

किनवट/माहूर

    किनवट विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रदिप नाईक यांचे आज हैद्राबाद येथे झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाल्याची दुर्दैवी घटना नववर्षाच्या पहाटे घडली असून या घटनेने संपुर्ण किनवट माहूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे…

 

आज दि. १ जानेवारी २०२५ रोजी किनवट विधानसभेवर सलग तीन पंचवार्षिका अधिराज्य गाजवलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे माजी आमदार प्रदिप नाईक यांचा आज पहाटे हैद्राबाद येथे त्यांच्या घरी झोपेत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. २ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मुळ गावी किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे….

दरम्यान या घटनेने संपुर्ण किनवट माहूर तालुक्यातील समस्त बंजारा समाजासोबत इतरही अठरा पगड जातींचे नेतृत्व म्हणून प्रचलित असलेल्या या नेत्याच्या अन:पेक्षीत निधनाने दोन्ही तालुक्यावर शोककळा पसरली असून संयमी, चाणाक्ष व दुरदृष्टीचा नेता हरवल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close