सामाजिकनोकरी संदर्भ
वडसा येथील जि.प. शाळेतील मुख्याध्यापकाला महापुरूषांच्या प्रतिमांचा विट…..
"महापुरुषांच्या प्रतिमांविनाच प्रजासत्ताक दिन.! शाळेचे दैवतीकरण करण्याचा प्रयत्न" 'मुख्याध्यापकांविरोधात कारवाईची गटशिक्षणाधिका-यांकडे लिखीत मागणी'
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर,प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील मौजे वडसा येथील जि. प. शाळेतील प्रजासत्ताक दिन हा महापुरूषांच्या प्रतिमांविनाच झाल्याची धक्कादायक बाब प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उघडकीस आली असून महापुरुषांच्या नावासह त्यांच्या प्रतिमांचाही वीट आलेल्या शाळा प्रशासनाने शाळेचे संपुर्ण दैवतीकरण करीत महापुरूषांच्या प्रतिमांविनाच प्रजासत्ताक दिन साजरा करून शासकीय नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी मुख्याध्यापकांविरोधात कारवाई करण्याची लेखी मागणी गटशिक्षणाधिका-यांकडे केली आहे..
येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तामगाडगे यांनी दि. २७ जानेवारी रोजी माहूरच्या गटशिक्षणाधिका-यांना दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दि. 26 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा केेेला जातो. जिल्ह्यातील, तालुक्यातील, गाव, खेड्यामध्ये देखील हा राष्ट्रीय सण अगदी देशभक्ती व बंधुत्वाच्या भावनेतून साजरी केला जातो. परंतु, माहूर तालुक्यातील मौजे वडसा येथील जि. प. च्या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहनासमयी शासनाच्या परिपत्रकाला हरताळ पुसून या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाच ठेवल्या नाहीत व त्यांच्या कर्तुत्वाचे स्मरण झाले नसल्याची गंभीर बाब घडली असल्याचे तामगाडगे यांनी लेखी तक्रार देवून संबंधित मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली आहे… तथापि, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रहितासाठी आपले सर्वस्व त्यागलेल्या महापुरूषांच्या कर्तुत्वाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श मांडण्याऐवजी शिक्षकच विध्यार्थ्यांना महापुरुषांच्या कर्तृत्वाबद्दल माहीती देण्यासंदर्भात डोळेझाक करत असेल तर विध्यर्थ्यांचे भवितव्य अंधारात असेल यात शंका नसल्याेही निवेदनात सांगितले आहे…
दरम्यान महात्मा गांधी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न करता प्रत्यक्षरित्या दैवतीकरणाचा संदेश देणा-या तसेच विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या प्रेरणेपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान करणा-या मुख्याध्यापकाची सखोल चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे.. अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तामगाडगे यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माहूर यांना देवून वरील मागणी केली आहे…
“विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडसा येथील मुख्याध्यापक माधव कोंडबाजी बाबळे यांनी जाणीवपूर्वक महापुरुषांना डावलत केवळ भारत मातेची प्रतिमा पूजनात ठेवून पुरोगामी राज्यामध्ये दैवती करण्याचा संदेश प्रसारित केला आहे. यामुळे सर्व संविधान प्रेमी व महापुरुषांना आदर्श मानणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या असून त्याच्यावर तातडीने कारवाई न झाल्यास त्यासंदर्भात संविधानप्रेमींकडून उग्र आंदोलन छेडणार असल्यातेही संविधानप्रेमी मंडळीकडून सांगण्यात आले आहे….