नोकरी संदर्भईतर
जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या माहूर तालुक्यातील ५१ ग्रा.पं. सदस्यांचे सदस्यत्व रद्द….
"जिल्हाधिकारी कर्डीले यांची कारवाई ; माहूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीत एकच खळबळ"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी पुरेशी वेळ देवूनही अद्याप जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या माहूर तालुक्यातील ३३ ग्राम पंचायतींमधील तब्बल ५१ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची धाडसी कारवाई जिल्हाधिका-यांनी केली असून दि. २६ मार्च २०२५ रोजी निर्गमित केलेल्या जिल्हाधिका-यांच्या या आदेशाने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे…
महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १० (१-अ) अन्वये निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिण्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून या मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे सदस्यत्व निरर्ह ठरेल अशी नियमांत तरतूद आहे.. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे परिपत्रक क्र. रानिआ-2019/प्र.कं.10/कर-5 दि. ७ नोव्हेंबर २०१९ नुसार अनु. जाती/जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग अधिनियम २००० च्या कलम १० नुसार जातीच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे प्राप्त करण्यात आलेले लाभ काढून घेणे.. मधील तरतुदीनुसार जिल्हाधिका-यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत…
याच अधिकाराचा वापर करताना नांदेड जिल्ह्यातील तब्बल १३६५ ग्राम पंचायत सदस्यांचे सदस्यत्व निरर्ह ठरविल्याचा आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी २६ मार्च रोजी निर्गमित केला असून यात माहूर तालुक्यातील एकूण ३३ ग्राम पंचायतींमधील सदस्यत्व रद्द केलेल्या ५१ जणांचे खालील प्रमाणे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे..
1) कमठेवाड संतोष आंबादास (लांजी)
2) पाईकराव गणेश उकंडराव (मालवाडा)
3) डाखोरे चांगोना दिगांबर (तांदळा)
4) किनाके दत्ता हनवता (पाचोंदा)
5) तोरकड दादाराव माधवराव (पाचोंदा)
6) काटमोडे सुभाष माधव (कुपटी)
7) कांबळे रमाबाई भिमराव (गुंडवळ)
8) वाघमारे मारोती परसराम (बोरवाडी)
9) राठोड रेखा अमोल (बोरवाडी)
10) धबडगावकर सिमा राजू (शेकापूर)
11) धबडगावकर बाळप्रसाद सदाशिव (शेकापूर)
12) बहिरमकर पुजा लहू (शे.फ. वझरा)
13) दोहिले योगिता अर्जुन (शे.फ. वझरा)
14) खुपसे नारायण एकनाथ (वायफनी)
15) राठोड रामेश्वर इरजी (मांडवा)
16) आरके पुजा अमोल (दत्तमांजरी)
17) तिलेवाड बाळू सुखदेव (दिगडी कु.)
18) कैलाश रायभान पिलवंड (दिगडी कु.)
19) शुभम शिवाजी पिलवंड (दिगडी कु.)
20) कातले सतिष बंडू (पडसा)
21) नागेश वृंदा प्रविण (रूई)
22) गायकवाड विजय बळीराम (रूई)
23) धबडगावकर महानंदा दिपक (रूई)
24) घाळवट सुनिल आशिर्वाद (टाकळी)
25) गेडाम सुनिता आशिर्वाद (टाकळी)
26) कुसराम मंगला यादव (अंजनखेड)
27) भगत प्रिती निखिल (अंजनखेड)
28) मडावी मनिषा विजय (अंजनखेड)
29) कातले काजल देविदास (गोंडवडसा)
30) तिळेवाड विठ्ठल काशिनाथ (मुंगशी)
31) पेंदोर सपना भाऊराव (मुरली)
32) धुर्वे रामदास झलपती (लोकरवाडी)
33) आत्राम सुनिल साहेबराव (लोकरवाडी)
34) गेडाम रंजना सतिष (वडसा)
35) कुमरे रमेश माधव (सायफळ)
36) यशोदा विष्णू कोवे (सायफळ)
37) तोनकुलवार रंजना रवी (करंजी)
38) माझळकर नंदा संभाजी (साकूर)
39) बरडे निषा दिगंबर (तुळशी)
40) पवार बेबीबाई प्रकाश (पापलवाडी)
41) लांडगेवाड सुधाकर काळू (हडसणी)
42) खुपसे दत्ता गोमाजी (अनमाळ)
43) पेडवाल वैशाली जगदीश (लिंबायत)
44) चुंगडे सुनिल गोपालसिंह (लिंबायत)
45) चव्हाण रघू भगू (मेट)
46) चव्हाण पुजा नागेश्वर (मेट)
47) अबनबोईनवाड शोभा बळीराम (हरडफ)
48) मुरके कुसुमबाई दत्ता (सिंदखेड)
49) मुरके दत्ता संभाजी (सिंदखेड)
50) वाघाडे अमोल आनंदराव (सिंदखेड)
51) मुरके छाया प्रमोद (सिंदखेड)

