
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेञ माहूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईशी संलग्न असलेल्या सरस्वतीराज संगीत विद्यालयाच्या संगीत अकॅडमीचे उद्घाटन दि.३१ मार्च २०२५ रोजी होणार आहे.अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी गायन,हार्मोनियम, तबला यासारख्या विविध विषयांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नूतनवर्षाच्या पावनपर्वावर वाई बाजार येथे प्रथमच श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संगीत अकॅडमीचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत शिक्षण हे केवळ कला म्हणून नाही तर व्यक्तिमत्व विकास, शैक्षणिक यश आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. संगीत शिकल्याने मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि सर्जनशीलता वाढते, तसेच त्यांना भावनिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत होते.हाच उद्देश ठेवून येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ व कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामधून महाराष्ट्राची राजगायिका म्हणून ठरलेली स्वराली जाधव यांचे वडील प्रख्यात संगीत विशारद राजु जाधव यांचे सरस्वतीराज संगीत अकॅडमीचे येथील श्रीगुरुदेव प्रार्थना मंदीराच्या भव्य सभागृहात दि.३१ मार्च २०२५ रोजी उद्घाटन होणार असून या माध्यमातून परिसरात संगीताचे बीज रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.तेव्हा परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच संगीतप्रेमीं बांधवांनी या संगीत अकॅडमीचा लाभ घेवून जीवनात आनंदाची लय आनावे असे आवाहान श्री गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्घाटनाचा कार्यक्रम सांय.४ वाजता श्रीगुरुदेव प्रार्थना मंदीराच्या भव्य सभागृहात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री श्री श्री १००८ श्रीमहंत ज्ञानेश्वर भारती महाराज श्रीक्षेत्र माहूर व गुरुवर्य श्री संत शहापुरी महाराज झटाळा हे तर प्रमुख पाहूणे म्हणून संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बंडप्पा गेंटलवार,रामराव मोरे,विनायक पाटील,सुधाकर वाटकर,युवा उद्योजक अतिष गेंटलवार,कार्तिक शंकरराव बेहेरे,बजरंग सलाम,अरुण खराटे,अभिजित केळकर,नंदु आरके,दिंगाबर खडसे,नंदु येरावार,मारोती मडावी,विष्णु उडदवाड,ज्ञानेश्वर दळवे,मणिष कर्णेवार,संस्कार बोलोजिवार परिश्रम घेणार आहे.
“अकादमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी गायन, हार्मोनियम, तबला यासारख्या विविध विषयांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार असून संगीत शिक्षणासाठी आधुनिक सुविधा व कुशल शिक्षण दिले जाणार आहे. जे विद्यार्थ्यांना संगीतामध्ये प्रावीण्य मिळवण्यास सहाय्य करणार असल्याचे अकॅडमीचे संचालक संगीत विशारद राजु जाधव यांनी सांगितले आहे….

