ईतर

मद्यधुंद ट्रकचालकाचा राष्ट्रीय महामार्गावर नागमोडी धिंगाणा..? चालकासह दोघे गंभीर…

रोडलगतचे 11 के.व्ही. पुरवठ्याचे दोन खांब उपटले;    विद्युत पुरवठा नसल्याने बालंबाल बचावले...

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

किनवट/माहूर

   मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने राष्ट्रीय महामार्गावर नागमोडी धिंगाणा घालून झालेल्या भिषण अपघातात चालकासह क्लिनर गंभीररीत्या जखमी झाले असून विद्युत पुरवठा सुरू नसल्याने दोघेही बालंबाल बचावल्याची घटना आज (ता. २८) रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर घडली…

हदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील राहूल देविदास पाईकराव वय ५० मद्यधुंद चालक येथीलच बाबाराव दिगांबर ससाने वय ३६ या एका सोबत्याला घेवून आयचर प्रो 6037 हा ट्रक एम.एच. 26 बी.ई. 8658 हा ट्रक घेवून चंद्रपूर वरून सिमेंट भरण्यासाठी निघाले होते. सकाळी नऊ वाजता पिंपरखेड वरून मद्यप्राशन करून निघाल्यानंतर साडेदहा ते पावनेअकराच्या सुमारास धनोडा येथे जेवन करण्यासाठी सोबत्याने चालकाला थांबवल्यानंतर धनोडा पैनगंगा काठावरील एका हॉटेलमध्ये पुन्हा यथेच्छ मद्यप्राशन करून न जेवताच चद्रपूरच्या दिशेने निघाल्याचे बाबाराव ससाने यांनी सांगितले….

दरम्यान माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर मद्यधुंद चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटू लागल्याने अक्षरश: ट्रकसह चालकाने नागमोडी धिंगाना घालताना अनेक वाहनचालकांना घाम फोडला.. त्यावेळी उमरा ते साईनगर फाट्याच्या दरम्यान ट्रक थेट महामार्गाच्या खाली उतरून सुसाट वेगाने 11 के.व्ही. चा सप्लाय असलेले दोन खांब उखडून 100 फुटांपर्यंत फरफटत घेवून गेले… यात ट्रकचालक राहूल पाईकराव हा मद्यधुंद चालक काच फोडून ट्रकसमोर फेकला गेला.. तर सोबत असलेला बाबाराव ससाने हा स्टेपनी च्या खाली दाबला गेला…

 

 

विशेष म्हणजे घटनेेेेच्या वेळी अनेकजण रस्त्यावर असल्याने जखमींना तातडीने माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात हलवले.. सुदैवाने 11 के.व्ही. च्या विद्युत तारेत विजप्रवाह सुरू नसल्याने मोठी जिवित हानी टळली असली तरी यात चालकाची अवस्था गंभीर असल्याची प्रत्यक्ष परिस्थिती आहे… वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलीसांत गुन्हा नोंद न झाल्याने घटनेची अधिकची माहीती प्राप्त होवू शकली नाही…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close