वाई बाजार येथे बार अँड रेस्टॉरंटवर धाडसी दरोडा ; किनवटच्या गंगानगर मधून एकास अटक…
"पोलीसांनी लावला चोवीस तासात छडा ; पोलीसांच्या कामगीरीचे कौतुक..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाई बाजार येथील स्वरा बार अँड रेस्टॉरंटवर धाडसी दरोडा टाकणा-या टोळीचा पर्दाफाश करताना सिंदखेड पोलीसांनी किनवट गंगानगर मधून एकास अटक केली असून अवघ्या चोवीस तासात प्रकरणात मोठे यश प्राप्त करून छडा लावल्याने पोलीसांच्या कामगीरीचे कौतुक होत आहे..
माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर वाई बाजार येथे असलेल्या स्वरा बार अँड रेस्टॉरंट येथे दि. १३ एप्रिल २०२५ रोजी शासनाने ठरवून दिलेल्या वेळी बार बंद केल्यानंतर बारवरील कर्मचारी घरी निघून गेल्यानंतर रात्री १२:१८ मिनिटांनी तीन अज्ञात इसमांनी धाडसी दरोडा टाकत बार चे शटर वाकवले. व बारमध्ये प्रवेश करून काऊंटरच्या गल्ल्यात असलेली २०,०००/-₹ (विस हजार रूपये) ची रोख रक्कमेसह ७,०००/-₹ (सात हजार रूपये) किमतीचे इनव्हर्टर तसेच काही चिल्लर माल असे अंदाजे ३० ते ३५ हजार रूपयाचा मुद्देमाल अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेला होता. त्या अज्ञात चोरट्यांच्या सर्व हालचाली तेथे लावलेल्या सिसीटीव्ही कॅमे-यात रेकॉर्ड झाल्या होत्या…
सदरची बाब काल दि. १४ एप्रिल रोजी सकाळी बारमालकाच्या लक्षात आल्यानंतर सिसिटीव्ही फुटेजसह त्यांनी याप्रकरणी पोलीस स्टेशन सिंदखेड येथे तक्रार देण्यात आली होती.. त्यानुसार सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५ नुसार गुन्हा नोंद करून सिसिटीव्ही फुटेजमधील दिसत असलेल्या इसमाचे फोटो विविध पोलीस ठाण्यांना पाठविले होते..
सदर फोटोच्या आधारावर किनवट पोलीसांनी गंगानगर किनवट येथून विष्णू यादव मेटकर वय २२ या तरूणास ताब्यात घेवून सिंदखेड पोलीसांच्या स्वाधीन केले असून अटक करण्यात आलेला विष्णू यादव मेटकर रा. गंगानगर किनवट यास आज दि. १५ रोजी न्यायालयासमोर उभे करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.. तर उर्वरीत दोन आरोपींचा शोध घेणे सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करणार असल्याचा विश्वास सिंदखेड पोलीसांनी व्यक्त केला आहे..
प्रकरणाचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. एच.एस. पठाण हे करीत असून प्रकरणाचा जलदगतीने तपास करून अवघ्या चोवीस तासात एकास अटक कल्याने सिंदखेड पोलीसांच्या कामगीरीवर समाधान व्यक्त होत आहे….

