चंद्रपूर येथून दिंडीत देवदर्शनासाठी आलेल्या मिल्ट्रीमॅन भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू…
'काल दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी माहूर दत्तशिखर च्या पायथ्याची घटना '

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
चंद्रपूर येथून दिंडीत देवदर्शनासाठी आलेल्या एका मिल्ट्रीमॅन भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना काल दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास माहूर दत्तशिखर च्या पायथ्याशी घडली असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे..
प्राप्त माहितीनुसार माहूर देवदर्शनासाठी चंद्रपूर येथून मागील तीन दिवसांपुर्वी चंद्रपूर येथून भाविकांची दिंडी निघाली होती. ती दिंडी काल दि. १२ रोजी माहूर येथे पोचली.. दरम्यान देवदर्शनासाठी आलेली दिंडी दत्तशिखर च्या पायथ्याशी आली असताना दिंडीत आलेले अहमदपूर तालुक्यातील देवकरा या मुळ गावचे परंतू हल्ली चंद्रपूर येथे वास्तव्यास असलेले मिल्ट्रीमॅन अशोक विनायक मुरकुटे वय ६५ या भाविकास हृदयविकाराचाल तीव्र झटका येवून त्यांना त्रास होवू लागला.. तेंव्हा त्यांना माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. परंतू रूग्णालयात येण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय वाठोरे यांनी तपासणी करून मृत घोषित केले आहे… मयत अशोक मुरकुटे यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे..
याप्रकरणी माहूर पोलीसांमार्फत तपास सुरू असून वृत्त लिहीपर्यंत आज दि. १३ रोजी मयताचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे…

