ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे टाकळी येथे धाडसी चोरीचा डाव फसला….
"ग्रामस्थांनी केलेल्या पाठलागाने चोरटे दुचाकी सोडून पसार ....."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे काल रात्री अंदाजे दिडच्या सुमारास ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे धाडसी चोरीचा डाव फसला असल्याची माहीती समोर आली असून विनानंबरच्या दुचाकीवर येवून दोन अनोळखी इसम संशयित रित्या गावात फरत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करताना त्या संशयितांना दुचाकी सोडून पळ काढण्याची वेळ आली. तर सोडून गेलेली दुचाकी माहूर पोलीसांनी ताब्यात घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे…
माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे अगदी काही दिवसांपुर्वी झालेल्या धाडसी घरफोडीची घटना ताजी असताना त्या धाडसी घरफोडीच्या घटनेची पाळेमुळे शोधून काढण्यात पोलीस प्रशासन व्यस्त असतानाच काल दि. ८ एप्रिल रोजी रात्री एक ते दिडच्या सुमारास काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेले दोघे अनोळखी इसम संशयितरित्या गावात फिरत असल्याचे लक्षात आले.. त्यावेळी फिरत असलेले इसम गावातील नसल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला..
दरम्यान दुचाकीवरून सैरावैरा रानात पळता येत नसल्याने त्या संशयितांनी आणलेली दुचाकी तशीच एका शेतात सोडून पळ काढला… दरम्यान धुम ठोकणारे संशयित हे चोरीच्याच इराद्याने आले असल्याचे खात्रीलायकपणे ग्रामस्थांनी सांगितले असून.. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता त्याच वेळी माहूर पोलीसांनाही या घटनेची माहीती दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे….. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी माहूर पोलीसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली अथवा नाही..याबाबतची अधिकृत माहीती मिळू शकली नाही..

