क्राइमईतर

आदिलाबाद वरून वझरा (शे.फ.) येथे कंदोरीला जात असलेल्या भाविकांचा ऑटो पलटी ; ८ जखमी, एक गंभीर

'दत्तशिखर घाटातील घटना ; जखमींना सोडून चालक ऑटोसह फरार'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

  आदिलाबादवरून माहूर मार्गे शेख फरीद वझरा येथे कंदोरीला जात असताना दत्तशिखर जवळील अवघड वळणावर भाविकांचा ऑटो पलटी होवून आठ जण जखमी तर एक महिला गंभीर झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली असून ऑटो पलटी झाल्यानंतर जखमींना आहेत त्या अवस्थेत सोडून चालक ऑटोसह फरार झाल्याचे जखमींकडून सांगण्यात आले आहे…

तेलंगणातील आदिलाबाद येथील ३ महिला व ५ पुरूष असे एकूण आठ भाविक आदिलाबादवरून माहूर मार्गे तालुक्यातील शेख फरीद वझरा येथे कंदोरीसाठी येत होते. दरम्यान माहूर येथील श्री रेणूकामाता व दत्तप्रभुंचे दर्शन घेतल्यानंतर दत्तमांजरीकडे जाणा-या घाटातील एका कठीन वळणावर ऑटोचालकाचा ऑटोवरील ताबा सुटून ऑटो पलटी झाला… यात रुकमा बाई वय 45, राजू वय 28, पोसानी वय 65, शांता बाई वय 45, तिरुमला वय 45, लींगअण्णा लय 55,  सुभाष वय 55 तसेच मुग्लेंदर वय 18 सर्व रा. आदिलाबाद हे जखमी झाले असून विजया लक्ष्मी वनजला ही अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे… वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी माहूर पोलीसांत गुन्हा दाखल न झाल्याने याबाबतची अधिक माहिती प्राप्त होवू शकली नाही…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close