सामाजिक

वाई बाजार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी …

"ग्रा. पं. पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत महामानवास मानवंदना ..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   वाई बाजार येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती हर्षोल्हासात साजरी करण्यात आली असून महामानवाच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांकडून महामानवास मानवंदना देण्यात आली..
   भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीप्रित्यर्थ वाई बाजार येथे मोठ्या उत्साहात जयंतीउत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य चौकातील निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करून बुध्द विहार परिसरातील धम्मध्वजाचे ध्वजारोहन तसेच विहार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून समाजबांधवांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्रिसरण व पंचशिलाचे ग्रहण करण्यात आले.
तद्नंतर सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्यासह डॉ. झनक मानकर, विधिज्ञ छंदक वाठोरे, मुनेश्वर थोरात, मिलींद कंधारे, सुभाष खडसे आदींनी आपले विचार मांडले.. यावेळी वाई बाजारचे उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष कैलाश बेहेरे, ग्रा. पं. सगस्य फिरोजखान पठान, गोवींद पवार, राजू शिंदे, दिपक कन्नलवार, आंबादास राजूरकर, डॉ. रमेश गावंडे, गोदामपाल शिवशरण साहेब आदींसह गावातील सर्व भिमअनुयायांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close