क्राइम

माहूर तालुक्यातील वडसा येथे पुर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान राडा ; एक गंभीर, चार जणांना अटक

"सिंदखेड पोलीसांत परस्परविरोधी दोन गुन्ह्यांत ८ जणांवर गुन्हा दाखल....

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

किनवट/माहूर

   पुर्ववैमनस्यातून माहूर तालुक्यातील वडसा येथे दोन गटात प्रचंड राडा होवून झालेल्या  मारामारीत एकजण अतिगंभीर झाल्याची घटना काल (दि. २०) रोजी सायं. साडेसातच्या सुमारास घडली असून याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या प्रत्येकी चार जणांवर गुन्हे दाखल करून चौघांना सिंदखेड पोलीसांनी अटक केली आहे…

 

 

काल दि. २० एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील मौजे वडसा तांड्यातील लाला यांच्या पानटपरीजवळ सायं. साडे सात वा. च्या दरम्यान सदरची घटना घडल्याचे सिंदखेड पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.. दरम्यान प्रकरणातील गु.र.नं. ५६/२५ या एका गुन्ह्यात फिर्यादी रब्बानी भ्र. शेेख शमी वय ४२ रा. वडसा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यातील संशयीत भिकू उत्तम चव्हाण, इंद्रा उर्फ गोलू रवी राठोड, आदित्य गणेश जाधव तसेच गणेश रामदास डोळस सर्व रा. वडसा यांनी संगनमत करून फिर्यादीच्या दिराचा मुलगा अलबक्ष यास मारहान करून दिर शेख जाबीर शेख मुसा यास इंद्रा उर्फ गोलू रवी राठोड यांने कु-हाडीने डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची तक्रार आहे…त्यानुसार भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ च्या कलम 118(2), 118(1), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील भिकू उत्तम चव्हाण आदित्य गणेश जाधव व गणेश रामदास डोळस यांना सिंदखेड पोलीसांनी अटक केली असून यातील इंद्रा उर्फ गोलू रवी राठोड हा रूग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे… तर यातील फिर्यादीचा दीर शेख जाबीर शेख मुसा हा अत्यंत गंभीर असल्याने त्यास नागपूर येथे उपचारकामी पाठवले आहे…

 

याच प्रकरणातील दुसरा गुन्हा गु.र.नं ५७/२५ मधील फिर्यादी गणेश रामदास डोळस याने दिलेल्या फिर्यादीनुसार यातील आरोपी शेख मोईस शेख युनूस, शेख सलमान शेख शमी, अलबक्श शेख साबीर व शख जाबीर शेख मुसा सर्व रा. वडसा यांनी मागील भांडणाचे कारणावरून आपसात कट रचून यातील शेख मोईस शेख युनूस याचे सांगण्यावरून इतर आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली… तर शेख जाबीर याने हातातील कु-हाडीने इंद्रा उर्फ गोलू रवी राठोड याच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची फिर्यादी आहे… यावरून भारतीय न्याय संहितेचे कलम 118(2), 61(2), 118(1), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील संशयित शेख मोईश शे. युनूस यास अटक करण्यात आली आहे…

   वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. काँ. एच.एस. पठाण हे करीत असून घटनास्थळावर तणावपुर्ण शांतता असल्याची प्रत्यक्ष परिस्थिती आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close