
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याच्या कर्तव्यात सर्वात महत्वाचा भाग असलेल्या एलसीबी (स्थनिक गुन्हे शाखा) च्या नावाने संपुर्ण तालुका पिंजून काढूून दमदार वसूली करणा-या ‘त्या’ खाजगी एजंटची महिण्याकाठी मिळकत ही एका पोलीस निरिक्षकांला मिळणा-या महिण्याच्या वेतनापेक्षाही अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत असून नियमित अवैध धंदेवाल्यांकडून तगडी वसूली करण्याचा महापराक्रम करून दमदार कर्तव्य बजावण्याचे बक्षीस म्हणून तालुक्यातील चिडी फकडी, गावठी दारू तसेच आयत्या वेळी समोर आलेले सर्व कामांची पावती याच खाजगी पंटरची बक्षीस म्हणून मिळकत असल्याची गोपनीय बाब विश्वसनूय सुत्रांकडून आता समोर येत आहे….
पोलीस विभागातील अत्यंत जबाबदार शाखा असलेल्या एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेकडे पाहिले जाते. ही शाखा प्रामुख्याने गुन्हेगारी तपासासाठी कार्य करणारी शाखा असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अत्यंत संवेदनशील आणि क्लिष्ठ गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी मदत करत असते.. तर गुन्हेगारांच्या नोंदी ठेवण्याचेही महत्वपुर्ण कार्य याच शाखेकडे असते.. त्यामुळे पोलीस विभागात या शाखेला मोठे महत्व आहे… दरम्यान माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणच्या अवैध व्यवसायाची इत्तंभुत माहीती असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या माहिती भंडारातील दात्यांची देणगी एका खाजगी पंटरमार्फत नियमितपणे वसूल केली जात असताना “त्या”च खाजगी पंटरची महिण्याकाठची कमाई ही कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस निरिक्षकाच्या मासीक वेतनापेक्षाही मोठी असल्याची धक्कादायक माहिती आमच्या माहितीस्त्रोतांमधील विश्वसनीय सुत्राकडून प्राप्त झाली आहे…
“विशेष म्हणजे ‘एलसीबी’च्या नावाखाली महिण्याकाठी वसूली करणारा ते खाजगी एजंट नेमका कोण..? याबाबत माहूर तालुक्यातील ‘बच्चा बच्चा’ अवगत असून याच पंटरने एलसीबीचे केवळ माहूर तालुक्याचे मासीक उत्पन एक लाखावरून थेट अडीच ते तीन लाखांवर नेल्याचे कळते… याच कामाचे बक्षिस म्हणून नियमित ग्राहक वगळता आयत्या वेळी तावडीत येणारे “चिडी-फकडी” व गावपातळीवरील गावठी दारू विक्रेते…अवैध देशी दारूचा गावोगावी घरपोच संचार करणारे तसेच गावपातळीवर याची विल्हेवाट लावणारे तमाम देशप्रेमी विक्रेते यांच्याकडून महिण्याकाठी घेतले जाणारे किमान हजार ते दोन हजार याच खाजगी पंटरला एसीबीने बहाल केल्याची चर्चा असून एलसीबी कडून या पंटरला अजून काही सुविधा दिल्याचे कळते….
एकंदरीतच पोलीस विभागातील अत्यंत जबाबदार पोलीस शाखेच्या नावाने वसूली नामक चंदा गोळा करणारे हे खाजगी पंटर नेमके कोण..? यांना हे कर्तव्य पार पाडण्याचे अधिकार नेमके दिले कुणी..? याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला खरंच काही माहीत नाही काय..? माहित असेल तर अद्याप कार्यवाही का नाही..? याबाबत पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्यासह नांदेडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी माहिती घेणे कर्तव्याचे बनले असून पोलीस विभागातील एका जबाबदार शाखेच्या नावाखाली संपुर्ण तालुकाभर वसूली करणा-या “त्या” खाजगी इसमाचा तातडीने शोध घेवून तगडी कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे…

