क्राइमईतर

पडसा येथील वादग्रस्त समाजमंदीर प्रकरणातील खळबळजनक बाब उघड..? 

यवतमाळचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी 'युवराज म्हेत्रे' चक्क माहूरचे बिडीओ म्हणून न्यायालयात हजर ; नेमके कशासाठी....? "न्यायालयाशी धोखाधडी केल्याप्रकरणी न्यायालयाकडून कठोर कारवाईची टांगती तलवार..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

पडसा येथील ‘त्या’ वादग्रस्त समाजमंदीर प्रकरणात खळबळजनक बाब उघड झाली असून चक्क यवतमाळचे उपमुख्यकार्यकारी हे माहूरचे गटविकास अधिकारी म्हणून खाजगी वकीलामार्फत नांदेड न्यायालयात हजर झाल्याने एकच खळबळ उडाली असून सन 2022 मध्येच बदली होऊन गेलेल्या यवतमाळच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी युवराज म्हेत्रे हे चक्क 2026 मध्ये माहूरचे बिडीओ म्हणून न्यायालयासमोर आल्याने ही चोरी नेमकी कुणाची..? व कशासाठी.?? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करताना वादीने न्यायालयाकडे सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याने या प्रकरणात न्यायालयाकडून मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे..

माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील समाजमंदीर बांधकाम प्रकरण सर्वश्रुत आहे. त्यात वैय्यक्तिक वादातून तेथीलच वसंता नागोराव भगत यांच्या कुटुंबावर येथील समाजातील एका स्वयंघोषित पुढा-याच्या चिथावणीवरून ‘सामाजिक बहिष्कार’ सदृश्य परिस्थिती निर्माण करून भगत यांच्या घराबाहेर पडण्याचा रहदारीचा रस्ताच बंद करण्याच्या उद्देशाने व जवळपास 200×200 फुटाचा सार्वजनिक खुला चौक संपुर्ण रिकामा असतानाही मुद्दामहून भगत यांना घराबाहेर पडण्याच्या ऐन रस्त्यात समाजमंदीराचे बांधकाम सुरू केले होते. त्यावेळी भगत यांनी न्यायालयाचे स्थगिती आदेशही प्राप्त केले होते. परंतू, न्यायालयाच्या स्थगिती आदेशाने चिडून थेट न्यायालयाविरोधात कृती करत त्याच ठिकाणी बांधकाम करून न्यायालयाचा अवमान केला होता. परिणामी पडसा येथील तब्बल 57 महिला व पुरूषांविरोधात न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्यात आली आहे. 
 जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नांदेड येथे प्रलंबित असलेल्या नियमित दिवानी दावा क्र. 289/2024 या प्रकरणाची नव्याने सुनावणी घेवून पुन्हा आदेश देण्याचे जिल्हा न्यायालयाने फर्मावल्यानंतर प्रकरणातील ग्रामसेवक व सरपंच मंडळीच्या वकीलांना अक्षरश: वरीष्ठ न्यायालयाकडून चपराक बसली होती. त्याच निराशेत पडसा येथील सरपंच व येथील सर्वच प्रकरणात ग्रामसेवकासह पडसा वासियांचे बांधिल वकील म्हणून असलेल्या एका वरीष्ठ खाजगी वकीलांने दि. 18-02-2026 रोजी माहूरच्या गटविकास अधिका-यांच्या वतीने न्यायालयात शपथपत्र, पत्तामेमोसह वकीलपत्र दाखल केले. त्यावेळी प्रतिवादींकडून होत असलेली बनवाबनवी व धोखाधडी संदर्भात किंचितशीही कल्पना भगत यांना नव्हती. मात्र गटविकास अधिका-यांना जिल्हा परिषद पॅनलचे सरकारी वकील उपलब्ध असताना चक्क खाजगी वकीलामार्फत हजर होण्याची वेळ का आली..? याबाबतची शंका भगत यांना आल्याने त्यांनी माहूर पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी यांची भेट घेतली. यांच्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान विद्यमान बिडीओ हे अद्यापही न्यायालयात हजर झाले नसल्याची खळबळजनक बाब समोर आली. तथापि, प्रस्तुत प्रकरणात माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे प्रतिवादी असून कोणत्याही वैयक्तिक नावाने प्रतिवादी नाहीत. असे असतानाही दि. 31 मे 2022 रोजी माहूर पंचायत समिती येथून बदली होवून गेलेले तत्कालीन गटविकास अधिकारी युवराज रतन म्हेत्रे हे या प्रकरणात चक्क माहूरचे गटविकास अधिकारी म्हणून न्यायालयात हजर कसे झाले..? विशेष म्हणजे निशानी क्र. 90 वर त्यांचे वकीलपत्र, 91 वर पत्ता मेमो, तर निशानी क्र. 92 वर म्हेत्रे यांनी त्यांचे म्हणने दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून वेळही मागितला… 
विशेषत:  याच काळात विद्यमान गटविकास अधिकारी यांच्या वतीने जि.प. पॅनलचे सरकारी वकील सुमेध टेंभुर्णीकर हे न्यायालयासमक्ष उपस्थित झाल्यानंतर युवराज म्हेत्रे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या वकीलपत्र संशयाच्या भोव-यात आले असून खाजगी वकील व एक जबाबदार अधिकारी असलेले युवराज म्हेत्रे यांच्याकडून वादीची नुकसान करण्याच्या हेतूने चक्क न्यायालयाची देखील धोखाधडी केलेली बाब आता उजागर झाली असून यवतमाळचे विद्यमान उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज रतन म्हेत्रे व त्यांचे खाजगी वकील यांना एवढ्या उचापती करण्याची नेमकी गरज का पडली..? अशाच प्रकारच्या धोकाधडीमुळे वादी वसंता भगत यांची यापुर्वीही नुकसान झाली होती. त्यामुळे ही बाब न्यायालयाच्या दष्टीने अत्यंत गंभीर मानली जात असून ही चोरी आता थेट न्यायालयाच्या अखत्यारीतच घडल्याचे सिद्ध होणार आहे. त्यामुळे स्वत:ला वरीष्ठ म्हणवून घेणा-या वकीलासोबत पडसाच्या “त्या” स्वयंघोषित नेत्याचे व त्याच्या अतिउत्साही मंडळीचे “बारा” वाजून त्याच्या कटकारस्तानाचे तिन तेरा हेणार हे आता निश्चित झाल्याने पडसा गावच्या ‘त्या’ नेत्यासह त्याच्या वानरसेनेत एकच खळबळ उडाली आहे…
“विशेष म्हणजे 31 मे 2022 रोजी माहूर पं. स. येथून बदली होवून गेलेले तत्कालिन गटविकास अधिकारी ‘युवराज रतन म्हेत्रे’ हे पदोन्नती होवून यवतमाळ जिल्हा परिषद येथे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) या पदावर कार्यरत आहेत. परंतू, त्यांनी फेब्रु. 2026 या चालू वर्षात माहूरचे गटविकास अधिकारी या नात्याने न्यायालयीन प्रकरणात उपस्थिती का दर्शवली..? याबाबतच्या अनेक बाबी व कारणे लवकरच स्पष्ट होणार असून न्यायालयाची दिशाभुल करून चक्क न्यायालयासोबतच धोखाधडी करण्याचा कुटील डाव नेमका कुणाचा..? पडसा येथील ‘त्या’ स्वयंघोषित पुढा-याचा..?, खाजगी वकीलाचा..? की यवतमाळचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी युवराज म्हेत्रे यांचा..? याबाबत काल दि. 10 रोजी काही महत्वपुर्ण घडामोडी घडल्या असून अधिकार नसताना देखील खाजगी वकीलामार्फत हजर होवून प्रकरणात स्वारस्य दाखवण्याचा त्यांचा नेमका हेतू काय..? कुणाच्या आदेशाने न्यायालयासमोर हजर झाले..? प्रकरणात एवढे स्वारस्य काय..? हे न्यायालयात लवकरच उघड पडणार आहे. ? किंबहूंना याच भितीने त्यांचे ‘ते’ वरीष्ठ खाजगी वकील देखील सुनावणीवेळी दांडी मारून बाहेरूनच सुनावणीवर लक्ष ठेवून असल्याची चर्चा न्यायालय परिसरात मोठ्या चवीने चर्चिली जात असून प्रकरणातील आणखी काही कुटील कारस्थान व लंपट पुढा-याकडून केलेले अनेक डाव आता लवकरच समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून प्रकरणाने रंजक वळण घेत बोगसगीरी करणा-यांंत वकीलासह त्याच्या रसद पुरविणा-या मंडळीत एकच खळबळ उडाली आहे… 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close