ईतर

माहूर वनविभागातील सावळ्या गोंधळामुळे कामे झालेल्या ठिकाणांचे ‘लोकेशन’ सांगण्यास टाळाटाळ…

"तब्बल १ कोटी १२ लाख ८१ हजाराची कामे गुलदस्त्यातच असण्याची दाट शक्यता"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

बाबाराव कंधारे…

 

  माहूर वनविभागाच्या सावळ्या गोंधळामुळे वनपरिक्षेत्राअंतर्गत तब्बल ३३ ठिकाणी कामे केलेल्या जागांचे लोकेशन देण्यास वनविभागाकडून नियमितपणे टाळाटाळ केली जात असून माहूर वनविभागाच्या या ‘शेखचिल्ली’ सदृश्य कृतीने तब्बल १ कोटी १२ लाख ८१ हजार रूपयाची कामे केवळ कागदोपत्रीच झाली असावी. किंवा येत्या पावसाळ्याच्या पुरात ती वाहून जाण्यासाठी ठेवली असल्याचीच दाट शक्यता आहे.
   विविध कारणाने सातत्याने चर्चेत राहणारा माहूर वनविभाग तांत्रिकदृष्ट्या अनेक पटीने पिछाडीवर असला तरी बोगस कामांच्या यादीत मात्र सर्वात अव्वल स्थान पटकावेल अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असून माहूर वनपरिक्षेत्रात तालुक्यातील विविध ठिकाणच्या  मृद व जलसंधारणाच्या कामांसह  33 कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल १ कोटी १२ लाख ८१ हजार रूपयाचा निधी माहूर वनविभागाला प्राप्त झाल्याचे पुरावे आहेत…
   मात्र वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या ‘स्टे’ मुळे तालुक्यातील अनेक ठिकाणच्या कामांना अद्यापही सुरूवातच झाली नसल्याची खळबळजनक व गंभीर बाब यापुर्वीच आमच्या माध्यमाने उघड केल्यानंतर वनविभाग सैरावैरा झाला यात तिळमात्रही शंका नाही. तर यामुळे प्रलंबित कामे तातडीने सुरू होतील अशीही माफक अपेक्षा वनप्रेमी बाळगून होते…
  दरम्यान वनविभागाने कामे केलेल्या या ३३ कामांचे नेमके ठिकाण कोणते.? याबाबतच्या लोकेशन संबंधी माहीती देण्यास वनविभाग सातत्याने टाळाटाळ करीत असून वनपरिक्षेत्र अधिकारी महोदयांनी तर माहिती विचारणा-या माध्यम प्रतिनिधींचे मोबाईल नंबर ‘ब्लँक लिस्ट’ मध्ये टाकण्याची कामगीरी केली आहे हे विशेष…!!
 यामुळे माहूर वनविभागाअंतर्गत एक मोठा घोटाळा उघडकीस येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून लवकरच १ कोटी १२ लाख ८१ हजार रूपयाचा निधी असलेल्या वरील ३३ ठिकाणच्या कामासंदर्भातील लोकेशन वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांकडून प्राप्त करून घेवून माहूर वनविभागातील गौडबंगाल लवकरच सर्वांसमोर येणार असल्याचे काही वनप्रेमी बांधवांनी सांगीतले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close