पैशांसाठी दुस-यांदा बोहल्यावर चढणा-या जोडप्यांसह सर्वधर्मीय विवाह मेळाव्याच्या आयोजकांवरही फौजदारी गुन्हे दाखल करा….
"पडसा येथील सर्वधर्मीय विवाह मेळाव्याच्या वस्तुनिष्ठ चौकशीसाठी अनेकजण सरसावले.."

(Bk महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
माहूर तालुक्यातील पडसा येथील विक्रमी विवाह लावणा-या सर्वधर्मीय विवाह मेळाव्याची वस्तुनिष्ट चौकशी करून विवाहित जोडप्यांचे दुस-यांदा लग्न लावून धार्मिक विडंबना करणा-या मेळाव्याच्या आयोजकांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभाग तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे लवकरच करण्यात येणार असून विवाह मेळाव्यात विवाहबध्द झालेल्या जोडप्यांच्या लग्नपत्रिका तसेच स्थानिक स्तरावर झालेल्या त्यांच्या विवाहाच्या नोंदीचे प्रमाणपत्रे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याबाबतची खास माहिती पुढे आलेली आहे.
माहूर तालुक्यातील महामार्गापासुन दूर असलेल्या मौजे पडसा येथे मागील २६ वर्षांपासून विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून या मेळाव्यास अधिकारी व पदाधिका-यांची विशेष उपस्थिती असते. अत्यंत ग्रामिण भाग असलेल्या पडसा येथील विवाह मेळाव्याचे मागील काही वर्षांपासून सर्वधर्मीय विवाह मेळाव्यात रूपांतर झाले असून विवाह मेळाव्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याचे चित्र आयोजक मंडळी दाखवत आहे. दरम्यान परवा २९ मे रोजी संपन्न झालेल्या विवाह मेळाव्यात विविध जातीधर्माचे तसेच आंतरजातीय जोडप्यांसोबतच तब्बल ३०३ जोडपे विवाहबध्द झाले. त्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांबाबत व हिंदू धर्मिय लग्न विधीच्या बाबतीत विचार केल्यास एकूण १९६ हिंदू जोडप्यांचे लग्न लागताना तिन-चार अपवाद वगळले तर कुण्याही जोडप्यांचे मामाश्री आंतरपाठ धरण्यासाठी नव्हते.. तर केवळ औपचारिकता म्हणून ही जोडपी उभी असल्याचेच दिसून येत होते.
विशेष म्हणजे समाजासाठी कुठलेही मोठे कार्य नसलेले आयोजक “आमदारासारखा आवं” आणून समाज हिताच्या नावाखाली एक प्रकारे धार्मिक विडंबना करीत असून मिळणा-या अनुदानासाठी आयोजकांनी बोगसगीरीतून विवाहित जोडप्यांना “आधा तेरा आधा मेरा” च्या समिकरणात बसविले असल्याची दाट शक्यता आहे. आणि केवळ याच हेतूने विवाह मेळाव्यातील जोडप्यांची संख्या फुगवली असल्याचा आरोपही दबक्या आवाजात संंपुर्ण तालुक्यातून होत आहे…
एकंदरीत धार्मिक विडंबना करणारे आयोजक व पैशासाठी दुस-यांदा बोहल्यावर चढणा-या जोडप्यांंची वस्तुनिष्ठ चौकशी करणे गरजेचे असून मागील २६ वर्षांपासून सुरू असलेल्या थोतांड मेळाव्याच्या आयोजनातून कोट्यावधींची माया जमवणा-या आयोजकांच्या मालमत्तेची चौकशी करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्यासाठी संपुर्ण पुराव्यानिशी लवकरच न्यायालयात धाव घेणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून माहीती प्राप्त होत आहे….
“विशेष म्हणजे मागील काही दिवसांपुर्वी माहूर तालुक्यातील विविध गावांत संपन्न झालेल्या लग्न सोहळ्यात विवाहबध्द झालेले जोडपे थेट विवाह मेळाव्यात दिसले. तर तालुक्यातील अनेक गावातील चालू वर्षात व चक्क मागील वर्षात लग्न झालेलेही अनेक जोडपे या विवाह मेळाव्यात दुस-यांदा विवाहबध्द झाली असल्याचे भयान वास्तवाचे नाटक आयोजकांकडून करण्यात आले. ही बाब आयोजकांसाठी लाजिरवाणी असली तरी पैशासाठी त्यांची नितीमत्ता प्रदर्शित करणारी आहे… त्यामुळे हा थोंताड प्रकार थांबणे अत्यंत गरजेचे असून सर्वधर्मीय विवाह मेळ्याव्यात विवाहबध्द झालेल्यांंची ग्राम पंचायत स्तरावर झालेल्या त्यांच्या विवाहाच्या नोंदी व लग्न न झाल्याच्या प्रमाणपत्रांची वस्तुनिष्ट चौकशी केल्यास सत्य समोर येण्यास कदापिही वेळ लागणार नसल्याचे अनेक जाणकार मंडळींकडून बोलले जात आहे..

