ईतर

शासकीय नियम धाब्यावर बसवून पुरातन ‘भानुतीर्थ तलावालगत जेसीबीच्या साह्याने खोदकाम ..? ; सार्वजनिक निधीचा दुरुपयोग..!

"कोणतीही परवानगी नाही, भानुतीर्थ वारवाला धोका; माहूर नगरपंचायतीचा आणखी एक 'द्रोही' प्रताप..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

 

(बाबाराव कंधारे)

किनवट/माहूर

बेकायदेशीर व नियमबाह्य कामांने सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या माहूर न.पं. चा आणखी एक प्रताप समोर आला असून शासकीय नियम धाब्यावर बसवताना पुरातन वास्तुला धक्का पोहोचवण्यासाठी पुरातन ‘भानुतीर्थ तलावालगत जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून त्यास इजा पोहोचविण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला असल्याने संबंधित विभागांची कोणत्याही प्रकारची पुर्वपरवानगी न घेता स्वत:चे खिसे गरम करण्याच्या प्रयत्नात माहूर न.पं. कजून सार्वजनिक निधीचा दुरुपयोग केल्याने विविध विभागांकडे तक्रार दाखल करून कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे…

 

 

माहूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कायद्याचे अभ्यासक केशव भगत यांनी विविध विभागांकडे केलेल्या लेखी तक्रारीतून ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र माहूरगड येथील नगर पंचायत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करून माहूर येथील आणखी एक थक्क करणारा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. तथापि, वार्ड क्रमांक ५ मधील जुन्या श्री जगदंबा शाळेजवळील सातव्या शतकातील मानली जाणारी ‘भानूतिर्थ बारव’ ही प्राचीन जलवास्तू नगरपंचायतीच्या खोदकामामुळे धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे..

 

 

विशेषत: माहूर नगरपंचायतीकडून कोणत्याही विभागाची पूर्वपरवानगी न घेता ०३ मार्च २०२६ रोजी जेसीबी मशीनद्वारे बारवेच्या सभोवती मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले. यासाठी नगर रचना विभाग, पुरातत्व विभाग किंवा इतर सक्षम प्राधिकरणांची लेखी परवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असताना सर्व नियम धाब्यावर बसवून थेट खोदकाम केल्याने हा प्रकार म्हणजे सार्वजनीक निधीचा दुरूपयोग करून केवळ स्वत:चे खिसे गरम करण्यासाठी केल्या गेलेला केविलवाणा व किळसवाणा प्रकार असल्याचा गंभीर आरोप तक्रारकर्त्याने केेला आहे…

 

 

दरम्यान माहूर नगर पंचायतीने केलेल्या या खोदकामामुळे बारवेच्या सभोवतालची जमीन मोठ्या प्रमाणावर उखडून टाकण्यात आली असून परिसरात माती व दगडांचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. परिणामी जड यंत्रसामग्रीच्या वापरामुळे प्राचीन दगडी बांधकामावर ताण निर्माण झाला असून या ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर प्रकाराबाबत नगरपंचायत माहूर, पुरातत्व विभाग नांदेड, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर संबंधित विभागांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे..

 

 

एकंदरीतच खोदकामासाठी वापरण्यात आलेला निधी हा सार्वजनिक निधी असून त्याचा बेकायदेशीर वापर केल्याचा थेट आरोप करताना हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आणि ऐतिहासिक वारशाचे नुकसान असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर इतिहासाचा अमूल्य ठेवा असलेल्या ‘भानूतिर्थ बारव’ या प्राचीन जलवास्तूच्या सभोवती बेकायदेशीर खोदकाम करून पूर्वजांचा अमूल्य ठेवा नष्ट होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या प्रकारास माहूर नगरपंचायत जबाबदार असल्याचा आरोप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह तहसीलदार माहूर व इतर संबंधित विभागांकडे तक्रारकर्ते भगत यांनी केली आहे….

 

 

“विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी याच भानूतिर्थ परिसरात अचानक करण्यात आलेल्या खोदकामादरम्यान पुरातन काळातील सोन्याचा मोठा खजिना सापडल्याची घटना घडली होती. ही बाब संपूर्ण परिसरात तसेच प्रशासनाच्या नोंदीतही सर्वश्रुत आहे. त्यामुळे याच परिसरात पुन्हा जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संशयाची लाट पसरली असून याच खजिन्याच्या लालसेपोटी तर हे खोदकाम करण्यात आले नााही नां…? असा दृढसंशय नागरिकांत निर्माण झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.. एवढेच नव्हे तर श्रीक्षेत्र माहूरगड हे धार्मिक व ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध असलेले एक पवित्र धार्मिक ठिकाण असून येेेथील प्राचीन वास्तूंचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतू, एखाद्या मधूर फळाला किड लागावी अगदी अशाच प्रकारची कीड माहूर शहराला मागील अनेक वर्षांपासून लागल्याचे जळजळीत वास्तव आता माहूरकरांनी स्विकारले असून केवळ दलितांच्या हक्काच्या विकास निधीचा दुरूपयोग करताना ऐतिहासिक रामगडाच्या पायथ्याला पोखरून केलेल्या सिमेंट रस्त्यासोबतच दलितवस्ती निधीची राखरांगोळी.. डोंगर पोखरून निर्मनुष्य ठिकाणी निर्माण केलेले सिमेंट रस्ते.. गरीब घरकूल लाभार्थ्यांच्या निधीवर बोगस एजन्सी सोबत संगनमत करून दरोडा, पवित्र धार्मिक स्थळाच्या अगदी पायथ्याशी नवनिर्मित थडग्यांची निर्मिती करून पवित्र धार्मिक स्थळाची केलेली धार्मिक विटंबना…! या सर्व कु-कर्मात अक्षरश: एक नव्हे तर अनेक सुवर्णपदके लुटण्यास पात्र असलेल्या माहूर नगर पंचायतीने सदरचे खोदकाम करून पौराणिक वारसा धोक्यात आणण्यासाठी केलेल्या या ‘निर्लज्ज’ कृतीने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close