दोन वर्षाच्या मुलासह पित्याची विहीरीत उडी घेवून आत्महत्या…
"सारखणी नजीकच्या दहेली येथील खळबळजनक घटना.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
दोन वर्षाच्या चिमुकल्यासह पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दहेली येथे आज दि. ६ रोजी उघडकीस आली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे…
सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे दहेली ता. किनवट येथील मयत विक्रम सुरेश मारशेटवार वय वर्षे 30 व शिवाजी विक्रम मारशेटवार वय वर्षे 2 वर्ष असे मयत बापलेकांची नावे आहेत. त्यांनी काल दि. 5 जानेवारी सायंकाळी 6 वाजेपासून ते आज सकाळी 6 च्या दरम्यान येथीलच राजेश संटी दिसलवार यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मित नोंद करण्यात आली असून या घटनेचा तपास ठाणेदार रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष कोंडापेल्लीवार हे करीत आहे. दरम्यान दोन्ही मयताचे उमरी बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम आईटवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र दहेली तांडा येथे दुपारी 12.30 च्या दरम्यान केले असून त्यांना येथील वैद्यकीय अधिकारी ओमप्रकास थोटे यांनी मदत केली . मयतास दोन भाऊ, आई असा परिवार असून आत्महत्येचे कारण अजुन समजले नसले तरीही मयताची पत्नी माहेरी राहत आहे असे सांगण्यात आले असल्याने पत्नीच्या विरहातून तर मयताने असे टोकाचे पाऊल उचलले नसेल ना..? याबाबतचे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत… या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे…





