कोठारी (सिंद) येथे भिमजयंती उत्साहात साजरी….

मांडवी, प्रतिनिधी
मांडवी जिल्हा परिषद गटातील कोठारी (सिंध) येथे भिमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून उपासक उपासिका व गावक-यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
काल दि. १४ एप्रिल सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास डॉ. किनवट तालुक्यातील व मांडवी जिल्हा परिषद गटातील महत्वपुर्ण असलेल्या कोठारी (सिंध) येथील बुद्ध विहारात जयवंत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गावकरी बांधवांसह धम्मबांधवांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनंम्र अभिवादन केल्यानंतर समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनचरित्रावर सखोल मार्गदर्शन करून आपले विचार प्रकट केले.
दरम्यान जयवंत कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विचार प्रकट करताना समाज प्रबोधन ही काळाची गरज असून यासाठी समाजातील एकोपा व साक्षरता या महत्त्वपुर्ण बाबींनाही उजाळा दिला. तर भीमजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी समाजातील अनेक बांधवाचे मार्गदर्शनही लाभले. यावेळी वैश्यपाल कांबळे यांच्यासह तुळशिराम कांबळे, वसंत कांबळे, पुंडलिक कांबळे, धर्मा पाटील, रवींद्र जाधव, राजू जोगदंडे यांच्यासह अनेक समाज बांधवांनी सक्रीय सहभाग घेवून भीम जयंती उत्साहात साजरी करण्यास परिश्रम घेतले..

