क्राइम

शेतीच्या वादातून एकाचा खून ; विधीसंघर्षीत बालकासह तिघांवर गुन्हा दाखल…

'माहूर तालुक्यातील ईवळेश्वर येथील खळबळजनक घटना'

 

 

माहूर, प्रतिनिधी
शेतीच्या वादातून झालेल्या गंभीर मारहाणीत एकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना ईवळेश्वर येथे घडली असून याप्रकरणी एका विधीसंघर्षीत बालकासह तिघांवर माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे…

 

 

माहूर तालुक्यातील मौजे ईवळेश्वर येथील फिर्यादी महिला अनिबाई हरीओम जाधव वय ४५ वर्ष यांनी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ता. ३० डिसेंबर रोजी दु. ४ वाजताच्या सुमारास फिर्यादीचे पती हरीओम गोपा जाधव व त्यांंचे शेतशेजारी असलेले आरोपी अर्जुन गेमसिंग राठोड, रोहीदास गेमसिंग राठोड, गेमसिंग मेहराम राठोड, एक विधीसंघर्षीत बालक यांचेमध्ये शेतीच्या कारणावरुन फिर्यादीच्या शेतात वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने सदर आरोपीतांनी
संगणमत करुन जिवे मारण्याचे उद्देशाने फिर्यादीस व फिर्यादीचे पती हरीओम जाधव यांना काठी, लोखंडी रॉड व चाकुने मारहान करुन गंभीर जखमी केले. दरम्यान जखमीवर शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचार चालु असताना काल दिनांक 3 जानेवारी २०२४ रोजी सकाळी 09.00 वाजता गुन्ह्यातील जखमी नामे हरीओम गोपा जाधव वय 60 वर्षे यांचा उपचारा दरम्यान शासकीय रूग्णालय यवतमाळ येथे मृत्यु झाला..

 

   याप्रकरणी मयताची पत्नी अनिबाई हरीओम जाधव रा. ईवळेश्वर यांचे फिर्यादीवरुन पो.स्टे. माहुर येथे गुरनं. 01/2024 कलम 302, 307, 326, 34 भादवी प्रमाणे आरोपी अर्जुन गेमसिंग राठोड, रोहीदास गेमसिंग राठोड, गेमसिंग मेहराम राठोड, एक विधीसंघर्षीत बालक यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आला आहे..दरम्यान माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात शोधपथक पाठवून व आरोपींचा शोध घेवून तालुक्यातील मांडवा परिसरातील शेतशिवारातून वरील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहीती माहूर पोलीसांच्या वतीने देण्यात आली आहे.. सदर गुन्ह्याचा पुढील तपास माहूरचे पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय पवार हे करत आहेत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close