सामाजिक
मलकागुडा येथे सरदार सरवई पापन्ना गौड यांची ३७४ वी जयंती उत्साहात साजरी…
"महान क्रांतिकारी सरदार सरवई पापन्ना गौड यांना अभिवादन"
( महाराष्ट्र न्युज नेटवर्क )
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या मौजे मलकागुडा, येथे बहुजन उद्धारक थोर क्रांतिकारक सरदार सरवई पापन्ना गौड यांची ३७४ वी जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली…
मूळचे आंध्रप्रदेशातील सरदार सरवई पापन्ना गौड यांनी मोघेलांच्या काळात गोर गरीब जनतेवर होणाऱ्या आत्याचाराच्या विरोधात बंड करून मोघलांना साळोकिपळो करुन गोर गरिबांना न्याय मिळवून दिला. अशा महान क्रांतिकारी सरदार सरवई पापन्ना गौड यांची ३७४ वी जयंती मलकागुडा येथील गौड कलाल समाज बांधवाच्या वतीने दि. १८ ऑगस्ट रोजी मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली. दरम्यान येथील समाज बांधवाच्या वतीने पापन्ना गौड यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. नंतर त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झालीत..
यावेळी माजी सरपंच विष्णू पडलवार यांच्यासह गौड कलाल समाजाचे माहूर तालुका अध्यक्ष रविंद्र मारकवार, पत्रकार नितीन पाटील कन्नलवार, सचिनभाऊ पडलवार, गजानन पडलवार, आनंदराव बोडलवार, बलवंत कन्नलवार, मनोज मारकवार, शेषराव पडलवार, राजु कन्नलवार, संदीप कन्नलवार, श्रीकांत कन्नलवार, मिलिंद पडलवार, संतोष निळकंठवार, चंद्रपाल बोडलवार, आदी उपस्थित होते,यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन,सचिनभाऊ पडलवार यांनी केले तर आभार पत्रकार नितीन पाटील कन्नलवार यांनी व्यक्त केले…