ग्रामीण रूग्णालय माहूरच्या रूग्ण समितीच्या सदस्य पदी अनिल वाघमारे व गजू भारती यांची निवड…
"नेते, पदाधिकारी व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
माहूर/प्रतिनिधी
माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळाच्या सदस्य पदी अनिल वाघमारे तर कार्यकारी मंडळ समितीच्या सदस्य पदी पत्रकार गजानन भारती यांची निवड करण्याचे पत्र आ.भीमराव केराम यांनी दिल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किरणकुमार वाघमारे यांनी रुग्ण कल्याण समितीची बैठक दि १२ रोजी बोलावून आमदार पुरस्कृत अनिल वाघमारे आणि गजानन भारती यांचा सत्कार करण्यात आला….
किनवट माहूर विधानसभेचे विकास पुरुष
आमदार भिमरावजी केराम यांनी दि. २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र देऊन भाजपाचे ओ.बी.सी. सेलचे प्रदेश सचिव तसेच रुग्ण कल्याण समितीमध्ये कार्यरत राहून रुग्णांना दिवस-रात्र सेवा देणारे सुपरिचित अनिल वाघमारे यांचे सह पत्रकार गजानन भारती यांची निवड करावी असे पत्र दिले होते. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशाने माहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. के. बी. वाघमारे यांनी वाघमारे व भारती यांना पत्राद्वारे कळवून व बैठकीस बोलवून त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विपिन बाबळे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
“रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी अनिल वाघमारे आणि गजानन भारती यांची निवड झाल्याने पुढील कार्यकाळात त्यांच्या हातून ग्रामीण रुग्णालयात सुविधा वाढाव्यात.. याबरोबरच रुग्णांची सेवा व्हावी.. यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ तसेच भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे……

