ईतर
समाज माध्यमांवर चित्रफित प्रसारीत करणारे वाई बाजार येथील ‘ते’ दोघेजण दोन दिवसांपासून बेपत्ता…..
"बेपत्ता इसमांचा शोध घेण्याचे सिंदखेड पोलीसांसमोर कडवे आव्हान.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाई बाजार येथील दोन इसम दि. १० फेब्रुवारी २०२५ यच्या रात्री १० वा. पासून बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी सिंदखेड पोलीस ठाण्यात दिली असून बेपत्ता मुलांचा शोध घेवून त्यांना मिळवून देण्याची मागणी सिंदखेड पोलीसांकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे…
वाई बाजार येथील आशाबाई विजय जाधव यांनी दि. ११ फेब्रुवारी रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा यशवंत विजय जाधव वय २८, व्यवसाय (ग्रा.पं.सेवक) रा. वाई बाजार ता.माहूर जि.नांदेड, वर्णनाप्रमाणे उंची साडेपाच फुट, रंग सावळा, केस काळे, अंगावरील कपडे पॅन्ट शर्ट, शिक्षण इयत्ता दहावी, तसेच बंजारा, हिंदी व मराठी भाषा येत असलेला वरील वर्णन असलेला त्यांचा मुलगा दि. १० फेब्रुवारी २०२५ च्या रात्री १० वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेला असून अद्यापपर्यंत तो घरी परत आला नसल्याने त्याचा शोध घेवून मिळवून देण्याची मागणी त्यांनी सिंदखेड पोलीसांत लेखी अर्जाद्वारे केली आहे….

“विशेष म्हणजे बेपत्ता असलेल्या यशवंत सोबत अजून एकजण असल्याचे सांगण्यात येत असून दोघेही मित्र सोबतच निघून गेल्याची चर्चा आहे.. तर निघून जाण्याआगोदर समाज माध्यमांवरून त्यांनी एक चित्रफित देखील प्रसारीत केली होती… त्यात सांगितलेल्या गोष्टींना सध्यातरी प्रसिद्धी देता येत नसली तरीही प्रसारीत केलेल्या चित्रफितीत अनेक गंभीर आरोप करून अंगावर पेट्रोल टाकून घेतल्याचेही दिसून येत होते. तदनंतर ते निघून गेल्याची चर्चा आहे… एकंदरीत या घडामोडींमुळे दोघांचेही कुटुंबिय अत्यंत भयभित असून संबंधित प्रकरण काहीही असले तरी त्यांचा शोध घेणे हे पोलीस प्रशासनासमोर कडवे आव्हान असल्याचे सांगण्यात येत आहे……

