क्राइम
अवैध धंद्याची माहीती पोलीसांना का देता..? म्हणत ‘मटका किंग’ मंडळीकडून पत्रकारास जिवे मारण्याची धमकी….!!
"पत्रकार रशीद फाजलानी यांच्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
मटका जुगाराच्या ठिकाणी सिंदखेड पोलीसांनी टाकलेला छापा जिव्हारी लागल्याने आमच्या अवैध धंद्यांची माहिती पोलीसांना का देता..? म्हणत पत्रकारास जिवे मारण्याची धमकी सारखणी येथील मटकाकींग मंडळीकडून देण्यात आली असून सारखणी येथील पत्रकार रशीद फाजलानी यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
नांदेड येथे नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यावर अंकुश लागल्याचे वास्तव आता हळूहळू लुप्त होतांना दिसत असून किनवट माहूर तालुक्यात बंद असलेल्या मटका जुगाराचे जणू टप्प्याटप्प्याने पुनरागमन होत आहे.. अगदी काल दि. २६ फेब्रुवारी रोजी सारखणी येथील मटका जुगार सुरू असलेल्या ठिकाणी धाड टाकून तब्बल सहाशे दहा रूपयाच्या रकमेसह एक भंगार मोटारसायकल सिंदखेड पोलीसांच्या हाती लागली… विशेष म्हणजे अथक परिश्रमाने अटक करण्यात आलेल्या यातील तिघांना नोटीस देवून सोडण्यातची प्रक्रियादेखील पार पडली…
दरम्यान पोलीसांकडून टाकण्यात आलेल छापा पत्रकाराने टाकण्यास लावला.. हा दुषित हेतू मनाशी बाळगून काही मटकाकिंग मंडळीकडून सारखणी येथील पत्रकार रशीद फाजलानी यांना आमच्या अवैध धंद्यांची माहीती पोलीसांना देता का..? असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली… याबाबत पत्रकार रशीद फाजलानी यांनी सिंदखेड पोलीसांत दिलेल्या तक्रारीवरून सारखणी येथील शंकर विठ्ठल राऊत व किशोर प्रेमसिंग राठोड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे….
या प्रकरणाची गंभीर दखल किनवट तालुका मराठी पत्रकार परिषदेने तातडीने पत्रकार संघाची बैठक घेऊन या बाबीचा निषेध केेेला आहे.. तर उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट यांना तक्रार दिली जाणार असून अशा समाजकंटकाचा बंदोबस्त करण्याची मागणी ही पत्रकार संघाच्या वतीने केली जाणार असल्याचे पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रमोद पोहरकर व सचिव बालाजी शिरसाठ यांनी सांगितले….
विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपर्यंत मटका जुगार पूर्णतः बंद अवस्थेत होता. त्यामुळे नागरिकांनी विषेशत: महिला भगिनीदेखील मटका बंद झाल्यामुळे समाधान व्यक्त करीत होत्या.. परंतू सद्यपरिस्थितीत सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारखणी व वाई बाजार येथील मुख्य चौकात मटका किंग मंडळीकडून बिनदिक्कतपणे मटका जुगाराचा बाजार मांडलेले वास्तव दिसत असून याकडे सिंदखेड पोलीसांचे दुर्लक्ष का..? असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे… त्यामुळे सिंदखेड पोलीसांनी वेळीच सावध होवून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर धाडसी कारवाया करून यावर अंकूश मिळवावा अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य बाळगून आहेत….

