ईतर

अज्ञात वाहनाच्या भिषण धडकेत दोघांचा मृत्यू ; माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील उमरा फाट्यानजीकची घटना…

"महादेवाचा नवस फेडून परत येणाऱ्या दाजी- मेव्हण्यावर काळाचा घाला"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

किनवट/माहूर

   महादेवाचा नवस फेडून परतणा-या दाजी-मेहूण्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने भिषण धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील उमरा फाट्यानजीक काल रात्री घडली असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे…

 

माहूर तालुक्यातील मौजे पानोळा येथील एकाच कुटुंबातील वीस ते पंचवीस भाविक ऑटोद्वारे महादेवाचा नवस फेडण्यासाठी आर्णी तालुक्यातील मौजे पांगरी या गावी गेले होते. तेेेथे जाऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नवस फेडून परत येत असताना यापैकी दोघेजण मोटरसायकल वरून माहूरवरून वाई बाजार मार्ग पानोळा जात असताना मौजे उमरा येथील राष्ट्रीय महामार्गावर त्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात प्रकाश परसराम राठोड वय 52 वर्ष याचे शिर धडापासून वेगळे झाले. तर भारत धनसिंग राठोड वय 55 वर्षे यांच्या खांद्या जवळून हात मोडला. या गंभीर धडकेत धडापासून शीर वेगळे झाल्याने प्रकाश जागीच गतप्राण झाला तर भारतने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दम तोडल्याची घटना काल दि. 3 रोजी रात्री 10 वाजता चे सुमारास घडली… यावेळी रस्त्याने जाणाऱ्यांनी 108 ला दूरध्वनीवरून कल्पना दिल्याने 108 ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळावर पोहोचून गंभीर जखमी अवस्थेत जिवंत असलेले भारत राठोड यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आणले.. दरम्यान जखमी असलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.. विशेष म्हणजे प्रकाश जाधव यांचे धडावेगळे होवून रस्त्यावर पडलेले शीर जवळपास एक तास रस्त्यावरच होते त्यावरून अनेक वाहने गेल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले…

…..घटनेची माहिती मिळताच माहूर पो. स्टे. चे सपोनि. शिवप्रकाश मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे घटनेची नोंद झाल्यानंतर आज दि. ४ रोजी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अक्षय सांगळे आणि आष्टाचे डॉ. संदेश राठोड यांनी शवविच्छेदन केले. तर एकाच घरातील जावई मेहुण्याचा अपघाती मृत्यू झाल्याने पानोळा गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणाचा तपास सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. गजानन चौधरी तसेच सिंदखेड पोलीस करीत आहेत….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close