प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना हप्त्याचे वितरण….
"तब्बल 10 लाख लाभार्थ्यांना 15 हजाराचा पहिला हप्ता वितरीत"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
श्रीक्षेत्र माहूर
ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासनाकडून आज देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2” च्या 10 लाख लाभार्थ्यांना 15 हजार रुपयांचा पहिला हफ्ता वितरण करून 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी आदेश प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले असून या कार्यक्रमांतर्गत मागील अनेक वर्षांपासून घरकुल मंजूरीच्या प्रतिक्षेेत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाची प्रतिक्षा प्रत्यक्षात पहावयास मिळाल्याची भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली…
माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी पी. डी. मुरादे, भाजपचे तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे यांचे सह मान्यवरांच्या उपस्थित माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे देखील लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले…
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लाखोच्या संख्येने घरकुल उभे राहत असुन गोरगरीब नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी घरकुल योजना मैलाचा दगड ठरत आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या योजनेत अधिकाधिक पारदर्शकता राहावी यासाठी लाभार्थ्यांना सर्वा समक्ष मंजुरीचे प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे.. किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते अनेक ठिकाणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. किनवट माहूर चे विकास पुरुष आमदार भीमराव केराम यांच्या सूचनेवरून माहूरच्या पंचायत समितीत हा कार्यक्रम संपन्न झाला..
यावेळी पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो लाभार्थ्यांसह सहाय्यक गटविकास अधिकारी पी. डी. मुरादे, विस्तार अधिकारी डी. डी. कोठेवाड, खुशाल पवार, अधिकारी, कर्मचारी आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

