सामाजिक
दिव्यांग, वृद्ध, निराधारांच्या थकीत अनुदानासाठी तहसिलदार व गटविकास अधिका-यांना निवेदन…
"दिला तीव्र आंदोलनाचा इशारा...!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहुर तालुक्यातील दिव्यांग, वृध्द, निराधार बांधवांना मिळणारे अनुदान मागील अनेक महिन्यांपासून वेळेवर मिळत नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासनास जागे करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार,सर्व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली…
यावेळी माहुर दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन तथा चर्चा करून निवेदनातील प्रश्न निकाली न काढल्यास दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही पुर्व सुचना न देता त्रिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे…
यावेळी शिष्टमंडळात राजुभाऊ शेरकुरवार, उमेश भगत, हेमसिंग आडे, दादाराव कांबळे, राजेश सुकळकर, रेवा राठोड, नामदेव लोहार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…

