माहूर येथे श्री दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी…
"बुद्ध पौर्णिमा व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खिरदान; अनेक मान्यवरांची हजेरी...!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
बुद्ध पौर्णिमा व महाराष्ट्र दिनाच्या दुहेरी संयोगाचे औचित्य साधून श्री दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली असून बुद्ध धम्मात अत्यंत महत्वाचे दान असलेले खिरदान वाटपाचा आस्वाद घेताना याप्रसंगी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली…
आज दि. १ मे रोजी बुद्ध पौर्णिमा व महाराष्ट्र दिन या दुहेरी संयोगाचे औचित्य साधून संपुर्ण तालुक्यात ठिकठिकाणी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान संपुर्ण तालुक्यात अन्नदानासाठी प्रचलित असलेले माहूर तहसील कार्यालयाचा गेटवरील, स्वर्गीय पिपळी बाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठानचे संचालक विजय कांबळे यांच्या पुढाकारातून आज दिवसभर खीरदान करण्यात आले. या खिरदानाचा शेकडो उपासकांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून लाभ घेतला.
यावेळी माहूर न.पं. चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्यासह माजी जि. प. सभापती संजय राठोड, भाजपाचे डॉ. निरंजन केशवे, अनिल वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार विजय आमले, डॉ. ओमप्रकाश साबळे, डॉ. आकाश जाधव, किसन राठोड, संदीप राठोड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुंदन भाऊ राठोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी, पत्रकार वसंतराव कपाटे, सय्यद रहमत अली, फिरोज पठाण, अँड. धीरज शेंडे, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष इलियास बावाणी, नंदकुमार जोशी, मुक्रम शेख, रणजीत लोखंडे वि. अ. पं.स., श्रीकांत राठोड सरपंच मुंगशी, पिंटू पाटील, विनोद सुर्यवंशी यासह अनेकांनी भेट देवून खिरदानाचा लाभ घेतला…


“विशेष म्हणजे बुद्ध धम्माच्या ऐतिहासिक, धार्मिक व नैतिक अशा तीनही बाजूने अत्यंत महत्वपुर्ण मानले जाणारे खीरदान (पायसदान) हे अत्यंत पुण्यकारक आणि प्रतीकात्मक असून या खीरदानाचे ऐतिहासिक महत्त्व तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाच्या घटनेेशी जोडलेले आहे. तथापि, गौतम बुद्ध हे बोधीप्राप्तीपूर्वी अतिशय कठोर तपश्चर्या करताना त्यांचे शरीर अत्यंत अशक्त झाल्याने त्या वेळी सुजाता नावाच्या उपासिकेने त्यांना खीर (पायस) अर्पण केली होती. याच खिरीमुळे त्यांना शक्ती मिळाली. व त्यानंतर कालांतराने त्यांंना बोधीप्राप्ती झाली होती. त्यामुळे खीरदान हे ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील निर्णायक क्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे बौद्ध धम्मात दानाच्या परंपरेत अत्यंत महत्वाचे “दान” (देणे) ‘खिरदान’ हे अत्यंत महत्त्वाचे सद्गुण असल्याने हा प्रकार विशेष दान म्हणून आदराने व श्रद्धेने ते भिक्खूंना किंवा गरजू लोकांना अर्पण केरतात.. एवढेच नव्हे तर खीरदान हे दया, करुणा आणि उदारता व्यक्त करण्याचे साधन असून ते शुद्ध मनाने दिले जाणारे सर्वश्रेष्ठ दान म्हणून बुद्ध धम्मात दिले जाणारे दान आहे…





