सामाजिक
माहूर तालुक्यात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी..
"रक्तदान, अन्नदान व खिरदानासह अनेक समाज उपयोगी उपक्रमांतून महामानवास मानवंदना..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाई बाजारसह माहूर तालुक्यात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी रक्तदान, अन्नदान व खिरदानासह अनेक समाज उपयोगी उपक्रमांतून महामानवास मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले.

तत्पुर्वी वाई बाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण जेष्ठ उपासक दिलीप साटवाजी खडसे यांच्या हस्ते तर विहार परिसरातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण अंजनाबाई उकंडराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर विहार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला उपस्थितांनी अभिवादन करून त्रिसरण व पंचशिलाचे ग्रहण करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकीचा वसा जपताना आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केले. यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण, सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर, भाजपचे डॉ. निरंजन केशवे, पिंटू पाटील वायफनीकर, डॉ. रमेश गावंडे, तसेच शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय खडसे यांच्यासह उपाध्यक्ष सागर खडसे, संदेश खडसे, विशाल खडसे, अनाथपिंडक कंधारे, अविनाश पठाडे, मिलिंद गायकवाड, यश खडसे, प्रफुल खडसे, अक्षय पठाडे, अजय खडसे, सुमेध खडसे, श्रीकांत मुजमुले, सम्यक खडसे, रोहन पारधे, दिपवंश कंधारे, विशाल पारधे, विशाल टोके, सिद्धार्थ खडसे, कुणाल कांबळे, रुद्र डोंगरे आदींंसह भिमजयंती उत्सव समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले..
★ ग्रा.पं. कार्यालय वाई बाजार येथे महामानवांची संयुक्त जयंती साजरी..
– ग्राम पंचायत वाई बाजार येथे सरपंच सिताराम दामा मडावी यांच्यासह उपसरपंच हाजी उस्मान खान पठान सर्व ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

★संदेशभाऊ केराम मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान…

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून संदेशभाऊ केराम मित्रमंडळाच्या वतीने वाई बाजार येथील जुन्या बसस्थानक परिसरात भव्य अन्नदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या अन्नदान कार्यक्रमात दिवसभरात हजारो स्थानिक व प्रवासी नागरीकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. या अन्नदान सोहळ्यासाठी प्रामुख्याने संदेशभाऊ केराम मित्रमंडळाचे प्रितम गेडाम यांच्यासह बालाजी मडावी, किशोर आत्राम, विष्णू पडलवार, तसेच अनेकसदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी आ. भिमरावजी केराम यांचे स्वीय सहायक प्रकाश कुडमते यांच्यासह वाई बाजारचे सरपंच सीताराम मडावी, प्रकाश खडसे, फिरोज पठाण, गोविंद पवार, विशाल खरे, सुजीत राठोड, विजय खडसे, अनाथपिंडिक कंधारे, विशाल टोके, डॉ. रमेश गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती..
★माहूर येथे श्री. दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने खिरदान…

– माहूर शहरातील विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वर्गीय पिपळी बाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठानचे संचालक विजय भाऊ कांबळे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने खिरदान कार्यक्रम आयोजित करून महामानवास अभिवादन करण्यात आले. हे खिरदान अक्षरश: दिवसभर सुरू होते. या खिरदान कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून खीर प्राशन केली. यावेळी माजी जि. प. सभापती संजय राठोड यांच्यासह शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक, भाजपाचे डॉ. निरंजन केशवे, अनिल वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार विजय आमले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुंदन राठोड, तसेच अ.भा. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह जेष्ठ पत्रकार वसंतराव कपाटे, गजानन भारती, दत्तात्रय शेरेकर, फिरोज पठाण, संजय बनसोडे, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष इलियास बावाणी आदी पत्रकार मंडळीसह अँड. धिरज शेंडे, शिवचरण राठोड, वसंत राठोड, दिगंबर जोशी, दिगंबर राठोड, नितीन जांबुतकर, कदिर बावाणी, शेख सलीम, प्रताप हजारे, लक्ष्मीकांत उर्फ पिंटू पाटील, शिवसेनेचे संघटक विनोद पाटील सूर्यवंशी, बालाजी गेंटलवार, उदय वानखेडे, गोपाल नाईक, नयनसिंह राठोड, नवल वानखेडे, प्राचार्य बाळू कलाने, गजानन शद्दलवार, तथागत मनवर, दीपक ठाकूर, बंडूभाऊ राठोड, दयाळू जाधव, बंडू चव्हाण, बाजीराव जाधव व शेकडो नागरीकांची उपस्थिती होती…





