ईतर

ग्रामीण भागात अल्पवयीन दुचाकीस्वारांचा हौदोस ; दुचाकींची अक्षरश: “शर्यत” जन्य परिस्थिती..!

'दुचाकींच्या कर्णकर्कश आवाजाला नागरीक वैतागले, पालक मात्र झोपेतच ; पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची गरज'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   शहरी भागासह वाई बाजार व ग्रामीण भागात मोटार वाहन नियमांची सर्रास पायमल्ली होत असून यात कळस म्हणजे अगदी अल्पवयीन मुले इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जाणिवपुर्वक विनासायलेंसरच्या दुचाकी रहदारीच्या रस्त्यावरून सुसाट वेगाने हाकत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभुमिवर संबंधित विभागासह पोलीस विभागानेही या गंभीर बाबीकडे लक्ष देवून थेट कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

    संपुर्ण तालुक्यात हिच परिस्थिती असून यासंबधी संबंधित यंत्रणा मुग गिळून गप्प असून संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देवून सामान्य नागरीकांच्या जिवांशी होणारा संभाव्य खेळ थांबविण्यासाठी संबधितांविरुध्द कठोर पाऊले उचलण्याची मागणी जनतेतून होत आहे.

     संपुर्ण राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू कसेबसे आटोपत असताना ग्रामीण भागातील काही अल्पवयीन ‘नवाबजादे’ तथा कॉलेजकुमार इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थीनींच्या नजरेसमोर हिरोगीरी करण्यासाठी विनासायलेंसर अथवा सदोष सायलेंसरच्या दुचाकी भरचौकातून सुसाट वेगाने पळवताना दिसून येत असून अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या या  बेशिस्तपणाला त्यांचे पालकही तेवढेच जबाबदार किंंबहूंना त्यांची मुकसंमती असल्याचेच बोलके चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. 

“विशेष म्हणजे मोडकळीस आलेल्या व भंगारवालाही घेणार नाही अशा दुचाकीवरून तिन तिन जणांना बसवून अगदी वेड्या वाकड्या पद्धतीने चालणा-या या दुचाकीस्वारांच्या हॉर्नचा व इंजिनचा मोठा आवाज ध्वनीप्रदुषणाबरोबरच अनेक अपघातसदृश्य परिस्थीतींना निमंत्रण देताना दिसत असून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणारे काही अल्पवयीन मुले, विना परवाना व नंबर प्लेट नसलेली वाहने, नंबर न ओळखू येणा-या फँसी नंबर प्लेट आदि सर्व बाबतीत संबंधित विभागाकडून दुर्दैवाने वेळीच निर्बंध घालण्याच्या अथवा कार्यवाही केल्याच्या घटना घडल्याचे दिसून येत नसल्याने सामान्य नागरीकाांसह लहान मुले, अभ्यासिकेसाठी बाहेर पडणा-या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या जिवीत्वास मोठा धोका तर निर्माण झालाच आहे. शिवाय अवैध धंद्यानाही ही बाब पोषक ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागासह पोलीस प्रशासनानेही या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष घालून अल्पवयीन चालकांसह फाजिल लाड पुरवणा-या पालकांवरही गुन्हे दाखल करावेत अशी माफक अपेक्षा जनसामान्य बाळगून आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close