नोकरी संदर्भ

माहूर तालुक्यातील अवैध वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष…!

"अवैध वृक्षतोडीची चौकशीही गुलदस्त्यात ; कर्मचा-यांच्या संगनमताने वृक्षतोडीचा आरोप.."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

ईवळेश्वर/गणेश चव्हाण

   माहूर तालुक्यात अवैध वृक्षतोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत असून वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे लाखो रूपये किमतीचे बहुमुल्य सागवान दिवसाढवळ्या तस्करांच्या घशात जात असल्याच्या पार्श्वभुमिवर करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी थातूरमातूर व कामचलाऊ प्रकारची झाली असल्याची तक्रार उप वन संरक्षक अधिकारी नांदेड यांच्याकडे करण्यात आली आहे…
    संपुर्ण माहूर तालुक्यातील जंगलपरिसरात सातत्याने अवैध वृक्षतोड होत असतानाच तालुक्यातील गुंडवळ येथेही मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याची पुराव्यासह लेखी तक्रार दि. ३ जुलै रोजी गुंडवळचे सरपंच रामेश्वर जाधव यांनी उपवन संरक्षक अधिकारी नांदेड यांच्याकडे केली होती. त्या पार्श्वभुमिवर उपवन संरक्षक अधिकारी नांदेड यांंनी सहाय्यक वनसंरक्षक (जंकास व कँम्पा) किनवट यांना दि. ५ जुलै २०२३ रोजी लेखी पत्र देवून तक्रारदाने तक्रारीत दिलेल्या लेखी मुद्द्यांच्या अनुषंगाने शासन नियमानुसार चौकशी व आवश्यक कार्यवाही करून चौकशी अहवाल सर्व संबंधितांच्या लेखी जबाबासह सादर करण्याचे निर्देशित केले होते. 
    परंतू सदर चौकशी अत्यंत थातूरमातूर व कामचलाऊ स्वरूपाची करून वनविभागाच्या काही अधिका-यांनी अवैध वृक्षतोड करणा-या लाकूड तस्करांसोबत हातमिळवणी केली असल्याची तक्रार रामेश्वर जाधव यांनी उपवन संरक्षक अधिका-यांकडे केली असून सदर प्रकरणी नव्याने फेर चौकशी करून दोषींवर आणि कारवाई करण्यात यावी असेही म्हटले आहे. दरम्यान संपुर्ण तालुक्यातील अवैध वृक्ष तोडीचे सत्र दिवसागणिक वाढतच असून वन विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी लाकूड तस्करांसोबत हात मिळवणी करून जंगलातील बहुमुल्य सागवान लाकडची मोठ्या प्रमाणावर  तोड करीत आहेत.. याकडे मात्र वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने या प्रकरणाची स्वत:  उप वनसंरक्षक अधिका-यामार्फत चौकशी करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून उग्र आंदोलन करण्याचा इशाराही जाधव यांनी दिला आहे….
     “माहूर तालुक्यातील गुंडवळ येथील झालेल्या अवैध वृक्षतोडीसंबंधी त्वरित पंचनामा करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. मानसी भारतात 28 झाड राहिले व आमेरिकेत 2876 झाडे आहेत हे फरक आपल्या हलगर्जी पणामुळे होत असून योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी…
   – रामेश्वर जाधव, सरपंच मौजे गुंडवळ ता.माहूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close