राजकिय

दावे-प्रतिदाव्यांच्या गोंधळघाईत वाई बाजारातील राजकीय वातावरण बनले स्फोटक…

 "उपटसुंभ मंडळीकडून ग्रा.पं. सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात जोरदार चर्चा"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
     निवडणूक खर्च विहित रितीने व विहित कालावधीत सादर करण्यात कसूर केल्याच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिका-यांनी पाच वर्षाकरीता ग्रा.पं.सदस्य राहण्यास किंवा निवडणूक लढविण्याकरीता अनर्ह ठरविल्याने यातून समोर येत असलेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या गोंधळघाईत वाई बाजारचे राजकीय वातावरण अक्षरश: दुषित व स्फोटक बनल्याची प्रचिती सर्वसामान्यांना येत आहे..
     मागील वर्षात म्हणजेच सप्टेंबर २०२२ मध्ये माहूर तालुक्यातील २४ ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणूक पार पडल्या. निवडणूक लढविणा-या तत्कालिन उमेदवारांकडून निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याच्या पार्श्वभुमिवर तालुक्यातील तब्बल १९ ग्रा.पं.मधील निवडून आलेले, माघार घेणारे व पराभूत झालेले अशा १३४ जणांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (ब) (१) नुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली. यामध्ये वाई बाजारचे सर्वाधिक २६ उमेदवार असून त्यात एक नवनिर्वाचित सदस्य हि कारवाईच्या फेऱ्यात अडकला आहे.. त्यातच निवडणूक खर्च सादर करताना “विहित रितीने व विहित कालावधीत” या शब्दप्रयोगाचे यत्किंचितही भान न बाळगता ‘सदोष’ खर्च सादर करणा-या ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांविरूद्ध येथील साजीद मजीद खान यांनी दाखल केलेले प्रकरण मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायदालनापुढे प्रलंबित असून यात दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेण्यासाठी येत्या १३ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे… 
 विशेषत: ही सुनावणीची पहिलीच तारीख असून या दिवशी कोणत्याही प्रकारचा आदेश होण्याची शक्यता नसल्यात जमा आहे.. परंतू याच तांत्रिक बाबीचा लाभ उठवत गावच्या सत्तासंघर्षात रस असलेले काही “रिकामे खोके” सरपंच तथा सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होवून नव्याने निवडणूक होणार अशा अफवांंच्या वावड्या उठवत असून ग्रा.पं. पदाधिका-यांवर अपात्रतेची कारवाई होवून निवडणूक लागणार या चिलमी गप्पांंनाही वेग आला आहे..
“विशेष म्हणजे सुरू असलेली चर्चा नेमकी येतेय कुठून याबाबत सर्वसामान्य अनभिज्ञ असून सुरू असलेल्या वायफळ चर्चेबाबत विद्यमान सत्ताधारी अप्रत्यक्षरित्या तक्रारदाराच्या गोटातून तर तक्रारदार सत्ताधा-यांच्या गोटातून येत असावी.. अशी शक्यता वर्तवित आहेत. तर प्रस्तुत प्रकरणी भविष्यात कोणत्याही बाजूने निर्णय आल्यास प्रकरण पुढे जाणारच.. ही देखील जाहीर आहे.. असे असतानाही अशा चर्चांना वाव देणे म्हणजे विरोधकांकडून पराभुत उमेदवारांना नवी उर्जा देण्याचे व पुढील तयारीसाठी सज्ज ठेवण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे..
    एकंदरीत वाई बाजारच्या सत्तासंघर्षाबाबतच्या होत असलेल्या चिलमी गप्पांंमुळे एकूणच राजकीय वातावरण स्फोटक बनले असून सध्याचे एकूणच वातावरण पाहता न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा भविष्यातील निकाल कोणत्याही बाजूने गेला तरी पुढील वाट मोकळी असल्याने.. ‘पाच वर्षे सत्ता भोगणारच..! ही सत्ताधा-यांची’..; तर तक्रारदारही ‘स्वस्थ बसू देणार नाही…’ अशी दोन्ही बाजूंची भुमिका ग्रामस्थ अनुभवत आहेत..
“मा. जिल्हाधिकारी यांच्या न्यायप्रणालीवर आम्हाला पुर्ण विश्वास आहे. अपात्रेची कारवाई होईलच असे वाटत नाही. निवडणूकीचा हिशोब आम्ही आम्ही ऑनलाईन ऑफलाईन अशा पद्धतीने सादर केला त्यामुळे भिण्याचे कारण नाही तरी सुद्धा भविष्यात उदभवणाऱ्या संभाव्य परिस्थीतीचा सामना करण्याची आमची तयारी आहे.
 — हाजी उस्मान खान पठाण  उपसरपंच ग्रा.पं.वाई (बाजार)
“वाई बाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदी निवडून आल्यानंतर नियमानुसार विहित रितीने व विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करण्यामध्ये कसूर केला आहे. जसे की, निवडणूक खर्च विवरण पत्रावर संबंधित उमेदवाराची स्वाक्षरी नाही. खर्चाचे ताळमेळ नाही, मुद्रांक शुल्क खर्च दाखविण्यात आलेला नाही. शिवाय नियमानुसार प्रमाणके जोडण्यात आलेले नाही. या निकषाच्या आधारावर जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे कलम 14 ब’ नुसार अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रकरण दाखल करण्यात आले आहे. कोणतेही कायदेशीर प्रकरण दाखल केल्यानंतर न्याय मिळेलच असे नाही परंतु निर्णय नक्की मिळतोच. ज्यांनी या  निकालाची धास्ती घेतली आहे. त्यांच्याच चेले चपाट्या कडून  दररोज नवनवीन तर्क वितर्क मांडले जात आहेत. अशा वायफळ गोष्टींमुळे या प्रकरणावर कोणताही परिणाम होणार नाही. पुराव्यांच्या पडताळणी नंतर प्रचलित कायद्याचा अभ्यास करून प्रकरण दाखल केले आहे. नियमानुसार प्रकरणाची प्रक्रिया सुरू असून निर्णय लागेलच..राहिला प्रश्न हा महत्त्वपूर्ण निकाल कोणाच्या बाजूने लागेल तर घोडा मैदान समोर आहे. न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणावर यापेक्षा अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
साजीद खान,
याचिका कर्ता
वाई बाजार ग्राम पंचायत प्रकरण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close