सामाजिक

निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात विदर्भ व मराठवाड्यातील तब्बल पन्नास गावात साखळी उपोषण सुरु…

"विदर्भातील २४ तर मराठवाड्यातील २६ गावांतून प्रकल्पास कडवा विरोध"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   बहुचर्चित निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या पार्श्वभुमिवर प्रकल्पास कडवा विरोध दर्शविताना विदर्भ व मराठवाड्यातील तब्बल पन्नास गावांत ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरु केले असून विदर्भातील २४ तर मराठवाड्यातील २६ गावांतून शेकडो ग्रामस्थांसह महिलांनीही साखळी उपोषणास सुरूवात केली आहे..
    विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवरील पैनगंगा नदीवरील निम्न पैनगंगा प्रकल्पात (चिमटा धरण) विदर्भ व मराठवाड्यातील एकूण ९५ गावे बुडीत क्षेत्रात जाणार असून मोठ्या प्रकल्पात जात असलेल्या बहुमुल्य शेतजमिनींना शासन कवडीमोल भाव देत असल्याचा धरणग्रस्तांचा आरोप आहे.. यात मराठवाड्यातील 26 गावांत मराठवाड्यातील गोकुळ, गोंडेगाव, सायफल बॉण्डगव्हान जुने, चौफुली, सावरखेड, बोंण्डगव्हान, नवीन वडसा, पडसा जुने, नेर, जुने व नवीन, हडसणी, शीख धानोरा, रामपूर व भामपूर, चिंचखेड, पाथरी, खेडी, अशा अनेक गावांंबरोबरच विदर्भातील २४ गावांतील नागरीक व शेतक-यांनी दि. २८ नोव्हेंबरपासून साखळी उपोषण सुरू आहे..
   यानिमित्ताने धरण विरोधी संघर्ष समिती आरपारच्या भूमिकेत असून आक्रमक पवित्रा घेत एकाच वेळी तब्बल 50 गावात साखळी उपोषणास सुरूवात केली असून येत्या १ डिसेंबरपासून साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.. 
 एकंदरीतच धरण विरोधी संघर्ष समिती आरपारची लढाई लढण्याची तयारीत असल्याने पोलीस व महसूल विभागापुढे अनेक अडचणी निर्माण होणार असून होत असलेल्या साखळी उपोषणामुळे शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्प उभारण्याच्या कामाला महत्व न देता  बुडीत क्षेत्रामध्ये जाणाऱ्या धरण विरोधी संघर्ष समितीच्या मागण्यांंना महत्त्व देणे हे गरजेचे असल्याचे एकूणच परिस्थितीवरून दिसून येत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close