ईतर

परभणीच्या ‘धनगर आरक्षण’ आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला अंजनखेडजवळ भिषण अपघात…

"दोन जागीच ठार, तिघे गंभीर ; सकाळी साडेचार ते साडेपाचची घटना"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर
धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या परभणी येथील आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला अंजनखेड जवळ भिषण अपघात झाल्याने दोघे जागीच ठार तर तिघांची प्रकृर्ती गंभीर असल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…

माहूर तालुक्यातील वाई बाजार पासून जवळच अवघ्या तिन कि.मी. अंतरावर असलेल्या सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजनखेड जवळील पुलावर सकाळी साडे चार ते पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली… प्राप्त माहितीनुसार सरफराजपूर ता. पालम जि. परभणी येथील चालकासह पाच जण धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेले होते. तेथून परतीच्या मार्गावर असताना वाटेत चंद्रपूर येथे देवदर्शन घेवून परतत होते. त्यावेळी हा भिषण अपघात घडला. दरम्यान सदरची घटना सिंदखेड पोलीस ठाण्याच्या रात्रपाळीवरील पथकातील कर्मचारी पो.ना. सतिष व चालक पो.ह. कदम यांनी घटनास्थळावर थांबून घटनेची माहिती सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांना माहिती दिल्यानंतर  सपोनि किनगे यांच्यासह अंजनखेड येतील ग्रामस्थ व पोलीस कर्मचा-यांनी जखमींना रूग्णवाहिकेतून रूग्णालयात धाडले व मृतकांना वाई बाजार येतील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणले… विशेष म्हणजे अगदी भल्या पहाटे घडलेल्या या अपघाताच्या ठिकाणी जखमींसाठी देवदूत ठरलेल्या सिंदखेड पोलीसांमुळेच जखमींना रूग्णालयापर्यंत घेवून जाता आल्याची भावना नागरीकांनी व्यक्त केली असून सिंदखेड पोलीसांच्या कर्तव्याचे जनतेतून कौतुक करण्यात येत आहे…

 

 

 या भिषण धडकेत डिझायर च्या समोरील बाजूचा अक्षरश: चुराडा होवून यातील रमेश दत्तराव वाघमारे वय ५० व लक्ष्मण पंडीत वाघमारे ३५ यांचा जागीग मृत्यू झाला.. तर चालक रंगनाथसंपथराव वाघमारे, रामजी बालाजी बनसोड व बापुराव मारोती वाघमारे यांना गंभीर अवस्थेत माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून दोघांची प्रकृर्ती चिंताजनक असल्याने जखमींना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रेफर केल्याचे सांगण्यात आले आहे…

 

“विशेष म्हणजे आज दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या अपघातातील स्वीफ्ट डिझायर एम.एच ०२ बी.पी. ९८३६ या वाहनाने पुढे जाणा-या मोठ्या व अवजड वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली असून पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात सदरचा अपघात घडला असल्याची घटनास्थळ परिसरात चर्चा आहे… घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीसांच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक एस.पी.नागरगोजे यांच्यासह पो.हे.काँ. दारासिंग चौहाण यांनी तातडीने हजर होवून सपोनी सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ पंचनामा केला असून घटनेचा पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे…

वाई बाजार येथे गोपीचंद पडळकरांनी घेतली मृतकांच्या कुटुंबियांची भेट; केले सांत्वन…!!

– सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघाताची वार्ता कळताच धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दुपारी ३ वा. वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून शवविच्छेदनासाठी आणलेल्या मयतांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच याठिकाणी उपस्थित असलेल्या मृतकाच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close