ईतर

सहायक जिल्हाधिकारी व तहसीलदाराच्या नाकावर टिच्चून वाई बाजार येथील वखार महामंडळाचे बांधकाम चोरीच्या रेतीने धडाक्यात सुरू….

 "महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष की अर्थपुर्ण संबंधातून डोळेझाक..??"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर
   माहूर तालुक्यातील तमाम रेतीघाट बंद असताना वाई बाजारसह तालुक्यातील अनेक सरकारी कामे चोरीच्या रेतीने धडाक्यात सुरू असून खाजगी बांधकामाची रेती पाहताच जप्त करण्याची धाडसी कामगीरी करणारे माहूर तहसिलदार व कर्तव्यकठोर म्हणून नावाजलेले किनवटचे सहायक जिल्हाधिकारी वाई बाजार येथील सरकारी बांधकामावर दिवसाढवळ्या येत असलेल्या नाल्याच्या अन् तेही चोरीच्या रेतीकडे लक्ष जात नसल्याने केवळ दुर्लक्ष की अर्थपुर्ण संबंधातून डोळेझाक..याबाबत चर्चांना उधान आले आहे…
    मागील वर्षात शासनाने नवीन वाळूधोरण जाहीर केल्यानंतर माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. परिणामी सर्वसामान्यांच्या घरगुती बांंधकामांसाठी वाजवी दरात रेती मिळणे दुरापास्त होवून बसले आहे.. याच गोष्टीचा फायदा घेत तालुक्यातील रेतीतस्कर महसुली कर्मचा-यांशी संगनमत करत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा पुरवठा करीत असून सरकारी कामांवरही चक्क चोरीची रेती बिनदिक्कतपणे उपलब्ध होत असल्याने सरकारी कामाच्या गणुवत्तेचा दर्जा तसेच महसूल प्रशासनाच्या मुग गिळून बसलेल्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे…
    मागील अनेक महिण्यांपासुन सुरू असलेल्या वाई बाजार येथील किनवट माहूर राष्ट्रीय महामार्गालगत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या वतीने सरकारी बांधकाम सुरू आहे…  विशेष म्हणजे याच ठिकाणावरून माहूरचे तहसिलदार किशोर यादव यांच्यासह किनवटचे सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन हे देखील अनेकवेळा मार्गक्रमण करत असतात..यात कळीचा मुद्दा असा की, कोणत्याही शासकीय कामांच्या बांधकामासाठी गौण खनिजाची रॉयल्टी पुर्वीच भरली असल्याचे सांगण्यात येते. परंतू माहूर तालुक्यातील सर्वच रेतीघाट अक्षरश: “सिल” ठोकल्यात जमा असल्याने सदर बांधकामांना सरळ मार्गाने रेती न आणता रात्री-बेरात्री व छुप्या मार्गाने रेती का आणावी लागते..? याचे संशोदन करण्याची गरज असून कर्तव्यनिष्ठतेच्या भन्नाट अविर्भावात वावरत असलेल्या महसूली अधिका-यांना सदरचे सरकारी बांधकाम मागील अनेक महिण्यांपासून रेतीविना सुरू आहे ते कसे..? किंबहूना सदर बांधकामावर वापरल्या जाणा-या रेतीची रॉयल्टी यापुर्वीच शासनाकडे भरली असेल तर त्याची खातरजमा करत येत असलेली रेती नेमकी आली कुठून याची साधी विचारपुसही करण्याची तसदी महसूली अधिका-यांनी घेतली नसल्याने माहूरचे तहसीलदार व सहायक जिल्हाधिका-यांच्या कार्यप्रणालीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.. परिणामी सहायक जिल्हाधिकारी व माहूरचे तहसीलदार यांचे ‘खायचे दात वेगळे…अन् दाखवायचे दात वेगळे..! असे तर नाही ना..? असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे…
   एकंदरीतच संपुर्ण तालुक्यातील रेतीघाट बंद असताना सरकारी कामांना रात्रीच्या वेळी तसेच अगदी सकाळच्या सुमारास रेतीतस्करांमार्फत जागोजागीच्या चौकात अधिका-यांचा मागोवा घेण्यासाठी उभ्या केलेल्या गुप्तचर यंत्रणांच्या होकारार्थी संदेसानंतर पुरवठा होत असलेल्या चोरट्या मार्गाने येत असलेल्या रेतीची महसूल विभागाने जातीने चौकशी करणे गरजेचे बनले असून रेती घाट बंद असताना सदर बांधकामांवर वापरण्यात येत असलेली शेकडो ब्रास रेती ही आली कठून..?? याबाबत सहायक जिल्हाधिकारी व तहसीलदार माहूर यांनी कठोर पावले उचलून सदरचे काम व ठेकेदारार दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी जनमानसातून होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close