सामाजिक

सारखणी येथे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

"सेवालाल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

सारखणी/प्रतिनिधी

किनवट तालुक्यातील सारखणी येथे प्रथमच हिरा नाईक नगर येथे सेवालाल महाराज यांच्या झेंडाची स्थापना करून प्रतिमेचे पूजन करून सेवालाल जयंती निमित्त भाषण करून अनेक चिमुकल्यांनी सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले व भीमनी पुत्र मोहन नाईक व भीमनिपुत्र अमोल नाईक यांनी सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेले पुस्तक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले…

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिरा नाईक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गोर सिकवाडीचे दिनेश काशिनाथ राठोड गोरसेनेचे संजय राठोड रामराव राठोड फकीरा पवार मिलिंद कांबळे पत्रकार त्रिंबक पुनवटकर डॉक्टर प्रवीण पवार नारायण सांगळे अमोल नाईक बोईनवाड सर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती..

 

यावेेळी गोरसिकवाडी चे दिनेश काशिनाथ राठोड यांनी क्रांतिकारी सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यातील गुटी तालुक्यातील गुलाल डोली गावात झाला आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते. सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील एक समाज सुधारक होते सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी क्रांतिकारी कल्याणासाठी त्यांनी शूरवीर मानवता पर्यावरण रक्षण धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरुद्ध लढा सुद्धा उभारला होता समाजातील अनिष्ट रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारण्यासाठी आग्रही भूमिका घेतली व त्यांचे वचन रपीया कटोरो पाणी वक जाये पलकेर खबर मलकिन कळी म्हणजेच मोबाईल जानंजो जो छानंजो पचत मांनजो र असे सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर अनमोल मार्गदर्शन केले.. तर अनेक मान्यवरांनी सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले..

 

तद्नंतर सेवालाल महाराज उत्सव पालखी व प्रतिमेचे मिरवणूक हिरा नाईक नगर येथील व गावातील फाट्यावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. येथील वसंतराव नाईक चौक येथे युवा नेते सचिन सचिन नाईक यांनी बंजारा लेंगी वर आपले नृत्य सादर केले..

 

यावेळी गावातील सरपंच सूर्यभान सीडाम भीमराव महाजन नवीन वाघमारे नारायण सांगळे संजय पवार निलेश चव्हाण संजय पवार सुरेश राठोड अरविंद जाधव तरुण मंडळी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 

 

 “बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची जयंती सर्वत्र साजरी होत असताना सारखणी येथील अभि व आयुशी सचिन जाधव या चिमुकल्या भावंडांनी बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशभूषेत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close