ईतर

लग्नसोहळ्यासाठी येत असलेल्या दुचाकीस्वाराची उभ्या टिप्परला जोराची धडक…

एक जागीच ठार, एक गंभीर ; गोंडवडसा येथील घटना

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर
विवाहसोहळ्यासाठी येत असलेल्या दुचाकीस्वाराने उभ्या टिप्परला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या धडकेत एक जण जागीच ठार तर एक गंभीर असल्याची घटना काल रात्री पावनेदहाच्या सुमारास गोंडवडसा जवळ घडली…

 

 

विदर्भातील घाटंजी तालुक्यातील विशाल शंकर मंतेरवार वय २३ रा. तरोड व संतोष पेटकुले वय ३५ रा. दातोडी हे दोघे माहूर तालुक्यातील अंजनखेड येथे आज दि. ६ रोजी असलेल्या नातेवाईकाच्या घरी त्यांची दुचाकी क्र. एम.एच. ३१ सी.१९९० या दुचाकीने येत होते. त्यावेळी काल रात्री ९ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास सारखणीकडून अंजनखेडकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील गोंडवडसा फाट्यानजीक उभे असलेले टिप्पर ए.पी. २६ टी.सी. २२५२ या उभ्या टिप्परला त्यांनी पाठीमागून जोराची धडक दिली… यात विशाल शंकर मंतेरवार याच्या डोक्याचा ‘चेंदामेंदा’ झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर जखमी असलेल्या संतोष पेटकुलेला उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याच्या तब्बेतीबाबतची अद्याप खात्रीशीर माहिती मिळाली नाही…

 

 

    घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांच्यासह पो.काँ. संजय शेडे, मोकले, संघरत्न यांनी घटनास्थळावर पोहचून मृतकास वाई बाजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले असून घटनेचा पुढील तपास पो. हे. काँ. दारासिंह गंगासिंह चौहाण हे करीत आहेत…

 

 

“विशेष म्हणजे याच महामार्गावर अगदी परवाला दोन परिक्षार्थी मुलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता… त्या घटनेनंतर अवघ्या काही तासानंतर ही घटना घडल्याने दुचाकीस्वांसह वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्याची नितांत गरज असल्याचे दिसून येत आहे. तथापी अल्पवयीन व भरधाव वेेेगात जाणा-या दुचाकीस्वारांवर पोलीस प्रशासनाकडून नियमितपणे कारवाईचा बडगा सुरू केल्यास अशा अपघातांवर आळा बसू शकतो.. त्यामुळे पोलीस प्रशासनाकून याची दखल होणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close