ईतरक्राइम

परिक्षा हॉल चित्रिकरण प्रकरणी फक्त पत्रकारावरच गुन्हा दाखल ; प्रसिद्धीसाठी मुलाखत देणारे मात्र तक्रारीबाहेर..!

"शिक्षणविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर
माहूर येथील बहुचर्चित ‘परिक्षा हॉल’ चित्रिकरण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात फक्त ‘त्या’ पत्रकारावरच गुन्हा दाखल करून शिक्षणविभाग मोकळा झाला असला तरी प्रसिद्धीसाठी मुलाखत देणारे ‘ते’ कर्मचारी मात्र बाहेरच असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मुलाखत देणारे केंद्रसंचालक व इतर दोषी नाहीत का..? असा थेट सवाल गणेश खडसे यांनी केला आहे…

 

माहूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा परिरक्षक राजू लक्ष्मण मुधोळकर यांनी काल दि. ७ मार्च रोजी माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी फिर्यादीत सांगीतल्याप्रमाणे… दि. ४ मार्च रोजी मा. शिक्षणाधिकारी (मा.) जि. प. नांदेड यांचे पत्र क्र. जिपना/शिअमा/मा- ९/ कैप / २९ दि. ४/०३/२०२४ अन्वये संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आदेशान्वये माहूर येथील रेणुका देवी महाविद्यालय माहूर येथील केंद्र क्र. २२५ येथे दि. २ मार्च रोजी ईयत्ता १२ चा गणिताचा पेपर सुरू असताना सकाळी ११.०० ते १४.१० वा. या वेळेत ‘सी न्युज’ या चैनलचे वार्ताहर गणेश खडसे यांंनी विनापरवाना प्रतिबंधीत परीक्षा दालनात जावून केलेल्या वार्तांकनाची चौकशी सुरु केली. त्यात वार्ताहार गणेश खडसे यांनी रेणुका देवी महाविद्यालयात पेपर हा सुरू असताना मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश क्र. जा. क्र. २०२४ / आर बी -१/ डेस्क -२/टे-५/१/फौ प्र स क कलम १४४/प्र क्र ०१ दिनांक २०/०२/२०२४ अन्वये जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन विदयार्थ्यांना त्रास होईल हे माहीत असताना देखील परीक्षा केंद्राचे दालनात वार्ताकन केले. व तसे केलेल्या चौकशीत मला निष्पन्न झाल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यासंबंधीची तक्रार माहूर पोलीस ठाण्यात दिली.. त्यावरून अपेक्षेप्रमाणे गु.र.नं. २३/२०२४ क, १८८ भादवि. नुसार पत्रकार खडसे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे….

 

… याउलट संबंधित मिडिया प्रतिनिधी गणेश खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते येथील श्री रेणुकादेवी महाविद्यालय माहर येथे बाहेरील ग्राउंड मध्ये बाहेरुन चित्रीकरण करत असताना श्री रेणुकादेवी येथील प्राध्यापक निलेश पाटील व केंद्रसंचालक हुंबे यांना सदर केंद्रावर कॉपी सुरू असल्याचे समजल्याने मी त्याबाबतचे वृत्तांकन करण्यासाठी आलो असल्याचे सांगीतले. त्यावर वरील कर्मचा-यांनी माझा हात धरुन
परीक्षा हॉल मध्ये नेले. मी त्यांना म्हटले माझाकडे कुठल्याही प्रकारची परीक्षा हॉल मध्ये जाण्याची परवानगी नाही. तथापि त्यांच्याच मर्जीने मला पोलीसांसमोरुन परीक्षा हॉल मध्ये नेले परीक्षा हॉल मध्ये दोन मिनीटाची मुलाखत दिली. यात जर मी जबरीने परीक्षा हॉल मध्ये गेलो असतो तर त्यांनी लगेच पोलीसांचा ताब्यात दिले असते… त्यामुळे दिलेल्या तक्रारीत परिरक्षक मुधोळकर यांनी केवळ एकतर्फी तक्रार दिल्याचा खडसे यांनी आरोप केला असून मला परिक्षा हॉलमध्ये घेवून जाणारे देखील तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे…

 

दरम्यान या प्रकरणात येथील विनोद सुर्यवंशी यांनी मा. तहसिलदार यांच्यासह व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड यांचेकडे लेखी तक्रार देत यांनी संबधित केंद्रसंचालकासह सर्व दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी लेखी अर्जातून केली होती. तर यातील सर्व शासकीय कर्मचा-यांना तक्रारीतूून बाहेर काढून किंबहूंना पोलीसांत दिलेल्या तक्रारीत त्यांचा साधा उल्लेखही न करता एकट्या पत्रकाराविरोधात गटशिक्षणाधिकारी माहूर यांनी माहूर पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे… एवढेच नव्हे तर मा. व उ. मा. प्रमाणपत्र परीक्षा नियमावली व महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती नियमावली 1981 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यासंबंधी शाळेच्या संस्था सचिव, अध्यक्ष यांना मुख्याध्यापक मार्फत कारवाई करण्यासंबंधी आदेशित केले असल्याची तोंडी माहिती माहूर शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत असली तरी याबाबतची प्रमाणित माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अद्यापही देण्यात आलेली नाही….

 

 

एकंदरीतच माहूर शिक्षण विभागाकडून संबंधित कर्मचा-यांना यातून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची स्फोटक बाब घटनेच्या दिवसापासूनच सर्वसामान्य ओळखून असून प्रसिद्धिसाठी स्वत: पत्रकारास थेट परिक्षा हॉलपर्यंत घेवून जाणा-या व चक्क परिक्षा सुरू असताना मोठ्या तो-यात मुलाखत देणारे ‘ते’ दोषी नाहीत का..? आणि असतील तर तक्रारीत तसा उल्लेख का नाही..?? असा थेट सवाल शिक्षण विभागासमोर ठामपणे उभा असून माहूर शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करताना याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्रकार गणेश खडसे यांनी आमच्या “वृत्तवाहिनी’ शी बोलताना सांगीतले आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close