सामाजिक

वाई बाजार येथील ‘श्री गोमाता’ यात्रा महोत्सवास सुरूवात…

'कुस्त्यांची दंगल, भजन स्पर्धा, शंकरपटासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर
मागील अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत वाई बाजार ग्रा.पं.च्या वतीने आयोजित श्री ‘गोमाता’ यात्रा महोत्सवाचे याही वर्षी आयोजन करण्यात आले असून तब्बल १५ एप्रिल पर्यंत चालणा-या या यात्रा महोत्सवात ग्राम पंचायतीच्या वतीने अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने भाविकांनी या यात्रामहोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे…

माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येतील सर्व धर्मियांच्या धार्मीक भावनांचा आदर करणारी यात्रा म्हणून येतील ‘श्री गोमाता’ यात्रा प्रसिध्द आहे… या यात्रेत सर्वधर्मीयांच्या धार्मिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन ग्राम पंचायत मागील अनेक वर्षांपासून करत असते. यात प्रामुख्याने अनेक सामाजिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रम ठेवून वाई बाजार ग्रा. पं. ने आपली ख्याती कायम ठेवली आहे.. तथापि वर्षानुवर्षाच्या परंपरेप्रमाणेच याही वर्षी श्री गोमाता छत्राखाली काल दि. २६ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत होणा-या या यात्रामहोत्सवास सुरूवात झाली आहे..

   

  या यात्रा महोत्सवात दि. २६ ते २७ मार्च रोजी प्लॉट वाटपानंतर गुरूवार दि. २८ मार्च रोजी सकाळी ९ वा. श्री. गोमातेसह बजरंग बली, श्री दत्तात्रय प्रभू यांच्या अभिषेकाने होणार आहे. शनिवार दि.३० मार्च रोजी सकाळी १० वा. बौध्द झेंडावंदन… मंगळवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात पहिले बक्षिस १५ हजार रूपये, दुसरे १० हजार, तिसरे ७ हजार, चौथे ४ हजार रू. तर पाचवे बक्षिस ३ हजार रूपये ठेवण्यात आले आहे.. बुधवार दि. ३ एप्रिल व गुरूवार दि. ४ एप्रिल रोजी शंकरपटाचे आयोजन असून यात प्रामुख्याने ‘मोठा गट’ व ‘तान्हा गट’ यामध्ये मोठा गटाचे प्रथम बक्षिस ४१ हजार रू., द्वितीय ३१ हजार रू., तृतीय २१ हजार, चतुर्थ ११ हजार, पाचवे ७ हजार, सहावे ९ हजार, सातवे ५१०० रू., आठवे ४ हजार रू., तर नववे बक्षिस ३ हजार रू. ठेवण्यात आले आहे… तर यातीलच ‘तान्हा’ गटातील पहिले बक्षीस २१ हजार रूपये, दुसरे १५ हजार, तिसरे १० हजार, चवथे ५ हजार, पाचवे ७ हजार, सहावे ३ हजार, सातवे २१०० रू. तर आठवे बक्षिस अकराशे रूपये ठेवण्यात आले आहे.. सोमवार दि. ८ एप्रिल रोजी भव्य कुस्त्यांची दंगल होणार असून यात प्रामुख्याने ‘मोठा गटात’ पहिले बक्षिस १० हजार रू. ,दुसरे ७ हजार, तिसरे ५ हजार रू. तसेच छोटा गटातील पहिले बक्षिस १५०० रू., दुसरे ११०० रू., तिसरे ७०० तर चवथे बक्षिस ५०० रू. ठेवण्यात आले आहे…

 

विशेषत: बुधवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी १० वा. पासून ‘गोंडी ढेमसा स्पर्धेला सुरूवात होणार असून या स्पर्धेचे पहिले बक्षिस ३० हजार रू., दुसरे २१ हजार रू., तिसरे १५ हजार, चवथे ७ हजार, पाचवे ४ हजार तर सहावे बक्षिस ३ हजार रूपये ठेवण्यात आले आहे…

 

शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी हजरत बाबा अब्दुल पिर साहेब यांचा संदल, रविवार दि. १४ एप्रिल रोजी भिमगितांचा समाजप्रबोधनपर कार्यक्रम तर दि. १५ एप्रिल रोजी दहीहंडीने या यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या वैविध्यपुर्ण कार्यक्रमांना नागरीक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रा.पं. प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे…

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close