
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
बारावी परिक्षेचे नियम धाब्यावर बसवून थेट परिक्षा हॉलमध्ये चित्रिकरण करून विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करणारी बातमी प्रकाशित झाल्यानंतर माहूरात एकच खळबळ उडाली असून अल्पशिक्षित व अपुर्ण माहितीच्या आधारे नको त्या ठिकाणचे चित्रिकरण करून आपल्या अल्पबुद्धीचा परिचय देणा-या माहूरमधील ‘त्या’ तथाकथीत पत्रकारासह केंद्रसंचालक व संबंधित कर्मचा-यांवर कार्यवाही करण्याची मागणी येथील विनोद पाटील सुर्यवंशी यांनी जिल्हाधिका-यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे…
संपुर्ण महाराष्ट्रात सध्या बारावीची परीक्षा सुरू असून परिक्षा मंडळाने कॉपीमुक्त परिक्षेसाठी अनेक नियम घालून दिले आहेत. असे असतानाही काही नविन परिक्षा सेंटरकडून आपले सेंटर “लय भारी” असल्याची बतावणी करण्याच्या नादात अनेक नियमांना पायदळी तुडवण्याची जणू स्पर्धाच पहावयास मिळत असून प्रसिद्धिसाठी अनेक माहितीविहिन माध्यमप्रतिनिधींकडून बातम्या प्रकाशित करून घेवून आपल्या सेंटरचा गवगवा करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत आहे… असाच काहीसा प्रकार माहूर शहरातील श्री रेणूकादेवी महाविद्यालयात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे…

माहूर येथील विनोद पाटील सुर्यवंशी यांनी माहूर तहसिदार यांचेमार्फत जिल्हाधिका-यांना दिलेल्या लेखी निवेदनात सांगितल्याप्रमाणे येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा सध्या सुरू असताना माहूर येथील श्री रेणुका देवी महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर शुक्रवार दि. १ मार्च रोजी परीक्षा केंद्रावर येथीलच तथाकथीत यू. ट्यूब टि.व्ही. चँनल म्हणून ज्ञात असलेले सी.टिव्ही न्यूज चँनेलचे प्रतिनिधी यांनी परीक्षा हॉल मध्ये जाऊन चित्रीकरण केले, व परीक्षा हॉल मध्ये विद्यार्थ्यांचा पेपर सुरू असताना परीक्षा केंद्रावर नियुक्त केंद्र संचालक यांची बाईट (मुलाखत) घेतली. याकारणाने परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा तब्बल सात मिनिटांचा वेळ वाया जावून परीक्षा नियमांचा भंग करण्यात आल्याची तक्रार केली आहे… तथापि शिक्षण मंडळाकडून घालून देण्यात आलेल्या नियमानुसार परीक्षा केंद्राच्या आत जाण्यास सक्त मनाई असताना संबंधित मीडिया प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलाच कसा..? परिरक्षकाने त्याला आत कसे जाऊ दिले..? परीक्षा हॉल मध्ये असलेल्या शिक्षकाने चित्रकरण कोणाच्या परवानगीने करू दिले..? मीडिया प्रतिनिधी ला परीक्षा हॉल मधील नियुक्त शिक्षक बाईट (मुलाखत) देऊ शकतो का..? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे….
विशेष म्हणजे सदर मीडिया प्रतिनिधी ने सी न्यूज या चॅनल ला आलेली बातमी (व्हिडीओ क्लिप) समाज माध्यमांवर (वॉट्सअप ग्रुपवर) मोठ्या प्रमाणात वायरल केल्याने हा सर्व प्रकार उजेडात आला. अखेर हा संपुर्ण प्रकार नियम भंगाचा असल्याने या प्रकरणी सखोल चौकशी करून मीडिया प्रतिनिधीसह केंद्र संचालक व संबंधित दोषी असणाऱ्या परिरक्षकासह सबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी व श्री रेणुका देवी कॉलेज चा परीक्षा केंद्र पुढील वर्षा साठी सद्द करावे. अशी मागणी विनोद पाटील सुर्यवंशी यांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिका-यांसह तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार माहूर, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर, गटविकास अधिकारी माहूर, गटशिक्षण अधिकारी माहूर तसेच पोलीस निरीक्षक माहूर यांना देण्यात आल्या असून या प्रकरणी प्रशासन नेमकी काय कार्यवाही करते याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे…



