ईतर

दत्तमांजरी ग्रा.पं. ने केलेल्या बोगस कामाची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करा….

"उपसरपंचासह ग्रा.पं. सदस्य व गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..."

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   दत्तमांजरी ग्रा.पं. ने केलेल्या बोगस कामाची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थ सरसावले असून आज दि. १५ रोजी येथील उपसरपंचासह ग्रा.पं. सदस्य व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना दिलेल्या  निवेदनातून ही मागणी केली..
      माहूर तालुक्यातील मौजे दत्तमांजरी येथे  ग्रा. पं. अंतर्गत अनेक बोगस कामे करून व कोणतेेही काम न करता लाखो रूपयाचा भ्रष्टाचार करून गावाची तसेच प्रशासनाची फसवणूक केल्याची गंभीर बाब जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी उघड केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांकरून अपहार केलेली रक्कम वसूल करावी. तसेच यास कारणीभुत असलेल्या सरपंच व ग्रामसेवक यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उपसरपंच सदस्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे माहूर येथे एका बैठकीला आले असता त्यांना माहूर येथे प्रत्यक्ष भेटून केली आहे…
     दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार दत्तमांजरी येथील सरपंचाचे पती अर्जुन बळीराम पवार हे स्वतः ग्रामपंचायतचा सर्व कारभार पाहत असून ग्रामसभा व मासिक सभा घेवू देत नाहीत. उलट सर्व ग्रामपंचायतची कार्यकारिणी माझी आहे. मी कशाला मासिक सभा  घेऊ असे उद्धटपणाने बोलतात. तर ग्रा.पं. सदस्य  शशांक दत्ता मोरे यांनी ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी दि. १४ मे २०२४ रोजी घेतलेल्या मासिक सभेतील इतिवृतांत व ठरावची माहीती ग्रामसेवकांना मागितली असता सरपंचपतीने त्यांच्यावर चिडून जावून सरपंच पतीने मोरे यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्यांना अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली असल्याचेही निवेदनात नमूद आहे….
   विशेष म्हणजे सरपंच पती याने यापुर्वीही त्यांची आई विमलबाई बळीराम पवार ह्या सरपंच असतांना चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून काहीही काम न करता १६ लाख रुपयाचा अपहार केलेला असून  स्वतःच्या शेतासाठी वनविभागाच्या मालकीच्या जमिनीतून रस्ता करून वनजमिनीवर अतिक्रमण केलेले असल्याने शासनाचे २४ लाख रुपये वाया जात असल्याचेही सांगीतले आहे. एवेेच नव्हे तर जलजीवन मिशन योजने अंतर्गतच्या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करण्याबरोबरच सीसी रस्त्यांची नासधूस करून व अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन होत असलेल्या कामांत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचेही सांगितले आहे..
एकंदरीतच लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणत शासनाच्या महिला सबलीकरण धोरणाच्या विरुद्ध वर्तन होत असलेल्या दत्तमांजरी ग्रा. पं. च्या कारभारात अनधिकृतपणे हस्तक्षेप करत असल्याने ग्रामपंचायत अंतर्गत आजवर झालेल्या सर्व कामांची  सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी अन्यथा आचारसंहिता संपताच दि.०५/०६/२०२४ पासून प्रशासन स्तरावर बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा शेवंताबाई गोपीनाथ आडे उपसरपंच ग्रा.पं. दत्तमांजरी यांच्यासह शशांक दत्ता मोरे सदस्य, कैलास गौतम कांबळे सदस्य, आरती सावन पवार सदस्य, मनोज मुकिंदा कीर्तने माजी उपसरपंच, दयाळू सक्रू जाधव, गोपीचंद नंदू आडे सावन तुकाराम पवार  यांचे सह अनेक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्याचे लेखी निवेदन  आहेत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close