सामाजिकनोकरी संदर्भ
माहूर तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब ; लघुशंकागृह देखील अदृष्य….
"नागरीकांची प्रचंड गैरसोय ; तहसीलदारांचा अँटीट्यूड मात्र जाईना..!!"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सर्वत्र बोंबाबोंब दिसून येत असून पिण्याचे पाणी तसेच लघुशंकागृहाअभावी प्रशासकीय कामांसाठी येणा-या नागरीकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने महागडे व बाटलीबंद पाणी पिणा-या तहसीलदार व अधिका-यांना सर्वसामान्यांना पिण्यासाठी साधे पाणी देखील ठेवण्याची सद्बुध्दी सुचत नाही का..? असा संतप्त सवाल नागरीकांतून विचारला जात आहे…
नांदेेड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या माहूर तहसील कार्यालयाच्या ठिसाळ प्रशासनाची आणखी एक विकृती पुढे आली असून अंगाची लाही लाही होणा-या उन्हात प्रशासकीय कामांसाठी संपुर्ण तालुक्यातून येणा-या शेतकरी, वयोवृद्ध, महिला व नागरीकांसाठी चक्क पिण्याच्या पाण्याची सोयच नसल्याचे वास्तव काल दि. २८ मे रोजी तहसील कार्यालयात आलेल्या एका निराधार आजीबाईने बोलून दाखवल्याने माहूर तहसील कार्यालयातील भयान वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. तर महागडे व बाटलीबंद पाणी पिणा-या तहसीलदारांंना नागरीकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी..असे वाटू नये का..? असा बोलका सवाल सदरच्या निराधार आजीबाईने उपस्थित केला…
विशेषत: प्रशासकीय इमारतीच्या वरच्या मजल्यावर पंचायत समितीसह दुय्यम निबंधक कार्यालय, उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय तसेच इतरही काही विभागांचे कार्यालये असून त्याच मजल्यावर एक अनाधिकृत चहा कँटींग सुरू आहे.. तर तहसील कार्यालयाच्या खालच्या बाजूला अगदी न दिसणा-या अवस्थेत एका कोप-यात दुसरी एक कँटींग सुरू आहे.. त्यातही विशेष बाब म्हणजे सदरच्या दोन्ही कँटींगवर बाटलीबंद पिण्याचे पाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे.. अशा परिस्थितीत पाणी विकत घेवून पिण्याची ऐपत नसलेल्या निराधार, वयोवृद्ध, महिला व नागरीकांना पिण्यासाठी थंड पाणी मोफत मिळेल काय.? हा यक्षप्रश्न अद्यापही अनुत्तरीतच असून शासकीय कार्यालयात येणा-या नागरीकांच्या मुलभुत गरजांसाठी शासनाकडून वेळोवेळी निधी देवूनही तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय का नाही..? सोबतच लघुशंकेसाठी देखील महिला व नागरीकांची कुचंबना का केली जाते..? असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे…
“खास बाब म्हणजे माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांना नागरीकांच्या अडचणींबाबत पत्रकारांसह अनेक नागरीकांनी अनेकवेळा भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता …फोन न उचलणे… व नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणे… या त्यांच्या अँटीट्यूडची प्रचिती सर्वसामान्यांना अनेकवेळा आली असून त्यांच्या ‘त्या’ फोन कॉल न घेण्याची चर्चा आता चवीने होवू लागली आहे.. त्यांना केले जाणारे फोन कॉल हे केवळ “हाय..हँलो” करण्यासाठीच नसून नागरीकांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी केले जातात. ही बाब त्यांच्या मश्तिष्कात खोलवर रूजवण्यासाठी खास करून जिल्हाधिकारी महोदयांनी माहूर तहसिलदारांच्या या जटील आजारावर रामबाण औषधोपचार करून नागरीकांच्या समस्या सोडवण्यास पुढाकार घ्यावा अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरीक बाळगून आहेत…