ईतर

गोंडवडसा येथील ‘जल जिवन’ योजनेचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराचे पलायन….

"'मुख्यमंत्री पेयजल योजने'च्या अर्धवट कामालाच "जलजीवन" चे काम जोडून फसवणूक केल्याची ग्रामस्थांची तक्रार"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

किनवट/माहूर

     गोंडवडसा येथील जल जिवन पेयजल योजनेचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराने चक्क पलायन केल्याची आश्चर्यजनक बाब पुढे आली असून मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या अर्धवट कामालाच जलजीवन चे काम जोडून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केल्याची तक्रार गटविकास अधिका-यांकडे ग्रामस्थांनी केल्याने संपुर्ण तालुक्यासाठी येथील जलजिवन पेयजल योजना चर्चेचा विषय बनली आहे..

 

माहूर तालुक्यातील मौजे गोंडवडसा येथील ग्रामस्थांनी दि. १२ जून रोजी गटविकास अधिकारी माहूर यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीनुसार, संबंधित ठेकेदाराने जल जिवन अंतर्गत येथील होत असलेल्या कामात प्रचंड अनियमितता केली असून मुख्य मंत्री पेय जल योजनेच्या अर्धवट कामालाच सदरचे काम जोड्न शासनाची फसवणुक केली असल्याचे सांगीतले आहे.. तथापि मौजे गोंडवडसा ता.माहुर येथे गत तीन वर्षापुर्वी तब्बल एक कोटी रूपयाची मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली होती.. त्यावेळी ते काम अर्धवट सोडुन गुत्तेदाराने पलायन केल्याने ते काम पुर्ण झाले नाही. मात्र त्यावेळी ‘त्या’ योजनेतून पाईप लाईन व इतर कामे झालेली होती.

 

दरम्यान त्यानंतर जल जिवन मिशन अंतर्गत गोंडवडसा येथे 1 कोटी 90 लाखाचा निधी मंजुर होवून या योजनेतुन संबंधीत ठेकेदाराने काम सुरु केले. मात्र शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत तिन वर्षापुर्वी झालेल्या जुन्या कामाला नविन काम जोडुन अंदाजे किमान 50 लक्ष रुपयाचा जवळपासन रक्कमेचा अपहार केल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला असून पुर्वी झालेल्या कामाची यंत्रसामग्रीच नविन कामाला जोडुन तात्परत्या स्वरूपात पाणी पुरवठा सुरु केल्याचा बनाव करुन केवळ बिले काढण्याचा फंडा कॉन्ट्रक्टर ने अवलंबविला आहे. असल्याचेही सांगीतले आहे.. ही शासनाची फसवणुक असून आज पर्यंत गावात पाण्याचा एकही थेंब आलेला नसल्याने सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करुन संबंधीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी. सरील कामाची उर्वरीत देयके देण्यात येऊ नये अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल.. अशीही लेखी तंबी प्रशासनाला ग्रामस्थांनी निवेदनातून दिली आहे…निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड तसेच तहसिलदार माहुर यांना दिल्या आहेत…

“प्रकरणाबाबतची प्रतिक्रिया व अधिक माहितीसाठी माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close