नोकरी संदर्भबिझनेस

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा निमित्ताने उद्या वाई बाजार येथे मेळावा….

'नागरीकांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे बँक प्रशासनाचे आवाहन'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

   महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अभिनव उपक्रामातील ग्रामीण नवचेतना संवाद यात्र निमित्ताने उद्या दि. १३ जून रोजी वाई बाजार येथे बँक प्रशासनाच्या वतीने मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास जास्तीत जास्त ग्राहकांसोबतच नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे…

महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा २०२४- महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव उपक्रम या कार्यक्रमांतर्गत बँकेमार्फत शेतक-यांसह महिला बचत गट, व्यापारी व उद्योजक, व्यावसायिक, गृह व व्यक्तिगत कर्ज वाटप, शेतीसाठी पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड या सोबतच केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणा-या सोईसुविधांच्या संदर्भातील सखोल माहीती देण्यात येणार असल्याचे बँक प्रशानाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले आहे…
   
त्या अनुषंगाने महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाडयातील सर्व जिल्ह्यामध्ये किमान ५० मेळाव्याद्वारे जनसंपर्क करून माहिती विषद केली जाणार असून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही यात्रा दिनांक 5 जुन रोजी छत्रपती संभाजी नगर येथून दोन वेगवेगळ्या मार्गाने निघाली आहे… तथापि यातील एक मार्ग असलेले पथक नांदेड जिल्ह्यातील माहुरसह वाईबाजार, उमरीबाजार, किनवट, बोधडी, इस्लापूर, हिमायतनगर, भोकर, तामसा, लहान व अर्धापूर या गावांना कार्यक्रम घेत नांदेडला जाणार असून या यात्रेचा भाग म्हणून वृक्षारोपण, नियमित कर्जदाराचा सत्कार, आर्थिक व वित्तीय साक्षरता, एटीएम वापर, बैंकिंग सामाजिक सुरक्षा योजना याबाबत जनजागृती आदी उपक्रम राबविले जाणार आहेत…
   विशेष म्हणजे या यात्रेत बँकेचे वरिष्ठ अधिकारी, संचालक मंडळ सहभागी होणार असून मोबाईल
महाग्रामीण नव चेतना संवाद यात्रेच्या कार्यक्रमात या मार्गावरील सर्व ग्रामस्थ, बँकेचे ग्राहक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच या यात्रेच्या कार्यक्रम व उपक्रम याची प्रसिद्धी विविध प्रसिद्धी माध्यामातून करावी असे आवाहन बँक च्या वतीने करण्यात आले आहे.. परिणामी उद्या दि. दि 13 जून रोजी वाई बाजार येथे सकाळी 08:30 वाजता होणा-या  मेळाव्यास माहूर तालुकयातील सर्व ग्रामस्थ तसेच बँकेच्या ग्राहकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन वाई बाजार शाखेचे शाखा व्यवस्थापक रोशन पेंदोर यानी केले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close