
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
शेतकी व गावकी वादातून अपयश येत असल्याचे पाहून आपल्या राजकीय वलयाचा फायदा घेत समाजाच्याच एका कुटुंबाला चक्क ‘सामाजिक बहिष्कार’ सदृश्य वाळीत टाकण्याचा घाट घातल्याचा किळसवाणा प्रकार पडसा येथे उघडकीस आला असून कंटाळलेल्या पिडीत दांपत्याने अनेक दिवसांपासून प्रशासनासह समाजाकडे नैसर्गीक न्यायाची मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने परिस्थितीला वैतागून थेट राष्ट्रपतींसह राज्यपाल व उच्च न्यायालयाकडे लेखी निवेदन देवून संपुर्ण कुटुंबाला इच्छा मरण देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे…
माहूर कालुक्यातील मौजे पडसा येथील वसंता नागोराव भगत यांनी महामहिम राष्ट्रपतींसह उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या मुख्य न्यायाधिश तसेच संबंधित विभीगातील तब्बल 20 ठिकाणच्या कार्यालयाला दिलेल्या सात पाणी लेखी निवेदनातून संपुर्ण कुटुंबासह इच्छा मरण देण्याची मागणी केली आहे.. त्यात त्यांनी सांगीतलेली बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून समाजातील राजकीय पुढा-याच्या पुढाकारातून समाजाकडूनच समाजाच्या व्यक्तीला व त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची महाराष्ट्रातील बहुधा ही पहिलीच घटनेेेने खळबळ माजली आहे.. त्यात सांगितल्यानुसार मौजे पडसा येथील बुध्द विहाराच्या परिसरात त्यांचे घर असून संपुर्ण परिसर मोकळाच असल्याने पुर्वीपासून त्यांचे परिसरातूनच येणे जाणे होते. परंतू दरम्यानच्या काळात परिसराच्या संरक्षण भिंतीसाठी निधी प्राप्त झाल्याने त्या भिंतीच्या बांधकामाचे ग्रा.पं. कडून ठरवण्यात आले होते. त्यावेळी तत्कालिन सरपंच आनंदा माधव किनाके यांच्या सही व स्वाक्षरीने भगत यांच्या घरासाठी किमान चार फुटाचा रस्ता सोडला होता.
परंतू तेथील बोगस विवाह मेळाव्याचे जनक व स्वयंघोषित नेते म्हणून नावारूपास आलेल्या प्रकाश गायकवाड नामक पुढा-याला ती बाब खटकली व त्यांनी त्यांचे वजन वापरून चक्क घराच्या पायरीजवळूनच संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास भाग पाडले… गोष्ट एवढ्यावरच थांबली नसून येणे जाणे साठी भगत यांनी विहार परिसराच्या मुख्य द्वारातूनही जावू नये यासाठी काही समाजकंटकांना हाताशी धरून मुख्य प्रवेशद्वारालाही मोठे कुलूप ठोकूून त्यांचे घराबाहेर पडणे बंद करून प्रत्यक्षरित्या त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले असल्याचे सांगितले आहे. तथापि वसंता भगत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना चक्क भिंतीवरून उड्या मारून ये-जा करण्याची दुर्दैवी वेळ समाजानेच लादल्याची खंत निवेदनात नमूद केली असून समाजानेच समाजावर अशी दुर्दैवी वेळ आणण्याची महाराष्ट्रातील ही निंदनीय व पहिलीच घटना असावी अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे…
दरम्यान शेतकी भानगडीत न्यायव्यवस्थेने भगत यांच्या बाजून निकाल दिल्यानंतर चिडल्याने प्रकाश गायकवाडसह त्यांची दोन मुले व गावातील काही जण त्यांना सातत्याने त्रास देत असून त्यांच्या त्रासापायी व बाहेर ये-जा करण्यासाठी रस्ताच कोंडून घेतल्याने प्रचंड मानसिक दबावात नैसर्गीक न्यायाची मागणी करताना दमछाक होत असल्याने असे जगण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे…ही भावना त्यांच्या मनात खदखदत असून न्यायासाठी त्यांनी थेट राष्ट्रपतीसंह महाराष्ट्राचे राज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पूणे, विभागीय आयुक्त औरंगाबाद, विशेष पोलीस महानिरिक्षक परिक्षेत्र नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, आ.भिमरावजी केराम, तहसिलदार माहूर, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर, गटविकास अधिकारी पं.स.माहूर, सहायक पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे सिंदखेड तसेच ग्रामसेवक ग्रा.पं. पडसा यांना लेखी निवेदन देवून न्याय द्या किंवा इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी केली आहे..
“विशेष म्हणजे निवेदनकर्ते वसंता भगत यांनी निवेदनात नमूद केल्यानुसार.. माहूर तालुक्यातील पडसा हे गाव सन १९६३-६४ या वर्षात पुनर्वसित गाव असून तेंव्हापासून ते पडसा येथील त्यांच्या जागेत वंशपरंपरेनुसार राहतात. दरम्यानच्या काळात येथीलच राजकीय वलय असलेले प्रकाश गायकवाड यांच्यासह त्यांची दोन मुले अमोल गायकवाड व सत्यम गायकवाड यांनी त्यांची शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर अनेक खोट्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. तर त्यातून ते सहिसलामत बाहेरही पडले. त्याचा राग मनात ठेवून आपल्या राजकीय वैभवाला धक्का लागू नये यासाठी ते वारंवार मला व माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी समाजातीलच काही जवळच्या लोकांना हाती घेवून सातत्याने त्रास देत असल्याचेही निवेदनातून सांगीतले आहे..

