ईतर

जुनापाणी नजीकच्या ‘त्या’ ऑपरेटरच्या मृत्यूचे गुढ दाटले, चोर सोडून संन्याश्यावर कारवाईचा बडगा उगारल्याची दाट शक्यता ;  खरे दोषी अद्याप पडद्याआड..?

"कंस्ट्रक्शन कंपनीची बनवाबनवी उघड; लायसन्स नसलेल्या हायवा चालकाऐवजी गरीब आदिवासी चालकावर गुन्ह्याचा ठपका..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

जुनापाणी येथील कंस्ट्रक्शन साईटवरील ‘त्या’ ऑपरेटर मजूराच्या मृत्यूचे गुढ आता दाटले असून संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीकडून स्वत:चा बचाव करण्यासाठी चोर सोडून गरीब आदिवासी हायवा चालकावर कारवाईचा बडगा उगारल्याची खुलेआम चर्चा होत असल्याने संशयित मृत्यूला आता अपघाती मृत्यू म्हणून दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे…

माहूर तालुक्यातील मौजे जुनापानी नजीक असलेल्या कंस्ट्रक्शन साईटवर ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या अजितकुमार यादव संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि. 2 मे रोजी उघडकीस आली होती. त्यावेळी मृतकाचा मृतदेह माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर कुटुंबियांनी आम्ही आल्याशिवाय शवविच्छेदन करू नका असा पवित्रा घेतला होता. परंतू, या सर्व घडामोडीच्या नंतर ख-या नाटकीय प्रपंचाला सुरूवात होवून कंस्ट्रक्शन कंपनीच्या सुपीक डोक्यातून एक आगळे वेगळे चित्र आता रंगवण्यात आले आहे..
 दरम्यान, हिंदी भाषिक असलेल्या राजदेव पि. टुकन यादव याने माहूर पोलीस ठाण्यात चक्क शुद्ध मराठी भाषेतून दिलेल्या तक्रारीनुसार, मृतक अजितकुमार यादव याला हायवा टिप्परची धडक लागल्याने त्या तो गंभीर जखमी होवून त्याच्या अंगावर हायवा मधील माती पडल्याने दबून मरण पावला. त्यानंतर फिर्यादी त्याच्या काही नातलगांसह कॅपला गेल्यानंतर कळाले की, मयताचे प्रेत माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात आणले. तेथे येवून पाहणी केली असता मृत अवस्थेत आढला…वगैरे वगैरे….  त्यानंतर आकाश यादव याच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे व फिर्यादीत नमुद केल्याप्रमाणे टाटा कंपनीचे हायवा क्र. MH -26 CH 9300 चे मालक नामे अजय रामदास मलगाम वय 58 वर्षे रा. गोकुळ गोंडेगाव याने रोड कटींग करून आणलेली माती आणून कॅंप समोरील पटांगणात असताना हयगयी व निष्काळजीपणाने हायवा चालवल्याने त्या हायवाची धडक मृतकाला बसली. त्यात तो खाली पडल्याने हायवाखाली आला व त्याच्यावर हायवातील माती पडल्याने त्याखाली तो दबून रात्री 12:10 मिनिटींनी मरण पावला असल्याने कारवाई करण्याची लेखी तक्रार दिली. ती तक्रार मान्य करून माहूर पोलीसांकडून अजय मलगाम याच्यावर गु. र. नं. 79/2026 कलम, 281, 125(b), 106(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
आता कळीचा मुद्दा असा की, मृतकाला हायवाची धडक लागली,.. तो जखमी झाला… अन त्याच्यावर हायवातील माती पडल्याने तो रात्री 12:10 वा. दबून मरण पावल्याची फिर्याद आहे.. घडत असलेली संपुर्ण घटना घडत असताना उपस्थितांनी कुणीही आरडा ओरड केली नाही हे विशेष..! तसे न करता ही घटना दुस-या दिवशी म्हणजेच दिवस उजाडल्यानंतर सकाळी 8:30 वा. च्या दरम्यान सदरची माती उचलत असताना मृतकाचे पाय दिसल्यानंतर कळते..! यावरून संपुर्ण घटनाक्रम संशयाच्या भोव-यात अडकलेला दिसत असून कुठेतरी निश्चितच पाणी मुरलंय.. हे जवळपास निश्चित मानले जात आहे..
 दरम्यान यात नाहक बळीचा बकरा ठरत असलेला संशयीत आरोपी दोषी का निर्दोष..? हा संशोधनाचा विषय असला तरी सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, त्यावेळी घटनास्थळी मातीची वाहतुक करणारे एकूण चार टिप्पर कार्यरत होते. त्या चारपैकी एक हायवा चालक हा अप्रशिक्षित असून त्याच्याकडे हायवा चालवण्याचे लायसन्स नव्हते. अशी खळबळजनक माहिती पुढे आली असून ‘त्या’ अप्रशिक्षित हायवा चालकाचा बचाव करून स्वत:च्या चमडीचा बचाव करण्यासाठीच संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीने हा घाट घातल्याचे परिसरात उघडपणे बोलले जात आहे. परंतू या सर्व घटनेत गरीब आदिवासी व हातावरचे पोट असणा-या हायवाचालक अजय मलगामचा बळी जात असल्याचे वास्तववादी पुरावे आमच्या माध्यमाजवळ उपलब्ध झाले असून हे पुरावे संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीच्या बनवाबनवीची लक्तरे फाडण्यास पुरेसे आहेत…
“विशेष म्हणजे, सदर प्रकरणी अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावर गुन्हा दाखल झाला त्या अजय मलगामने संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीच्या स्थानिक सर्वेसर्वा असलेल्या एका स्वयंघोषित साहेबांना कॉल करून विचारले की, साहेब माझी काही चुक नसताना तुम्ही मला का अडकविले..? याबाबत ‘तो’ साहेब सगळं काही निपटवलंय..! कोण म्हणते तुुुुुुुझ्यावर गुन्हा दाखल केला..? पेपरच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नको..ते काहीही लिहीतात.. अशा अनेक रंजक आणि वास्तव दर्शक सत्य मांडणारी क्लिप आमच्या हाती उपलब्ध झाली आहे. अशात ज्यावर गुन्हा दाखल होवून आरोपी केले तो संशयित खरंच दोषी..? का निर्दोष..? याबाबत कदाचित पोलीस प्रशासनाला देखील चांगल्या प्रकारे माहीत असावे ही शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे माहूर पोलीसांनी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रिदवाक्याला साजेसा निष्पक्ष तपास करून पडदाआड लपून बसलेल्या दोषींची पाठराखण न करता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा… अन्यथा प्रकरणाचा संपुर्ण घटनाक्रम.. समोर आलेली प्रत्यक्ष परिस्थिती.. व बनवाबनवी दर्शविणा-या फिर्यादीचा प्रश्न एकाच धाग्यात गुंफण्याची वेळ आल्यास संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीसोबतच पोलीस प्रशासनाच्या देखील प्रकरण अंगलट येईल अशी दाट शक्यता असल्याचे कायदेविषयक जाणकार मंडळींकडून बलले जात आहे…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close