क्राइम

गोंडवडसा नजीक दुचाकीस ट्रँक्टरने उडविले; एक जागीच ठार, एक अतिगंभीर…

"मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रँक्टरचालकास नागरीकांचा चोप"

 

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

किनवट/माहूर

गोंडवडसा नजीक दुचाकीला ट्रँक्टरने उडविले असून या भिषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा अतिगंभीर असल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहे.

आज दि. १८ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोंडवडसा फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या गोंडवाडी फाट्यानजीक माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील गणेश भिमराव कुसराम वय ४२ वर्षे व राजकुमार शंकर शेंडे वय २२ वर्षे हे दोघेही सारखणी येथील कापडदुकानावरील काम निपटून घरी अंजनखेड कडे येत असताना माधव भिमा देेेेवकर वय २४ रा. बोधडी ता. किनवट हा अत्यंत मद्यधुंद अवस्थेत ट्रँक्टर चालवित होता.

दरम्यान गोंडवडसा नजीक असलेल्या गोंडवाडी फाट्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रँक्टरचालकाने दुचाकीस जोरदार धडक दिली. यात गणेश भिमराव कुसराम वय ४२ रा. अंजनखेड ता. माहूर याचा जागीच मृत्यू झाला. तर राजकुमार शंकर शेंडे यास गंभीर अवस्थेत वाई बाजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय हुलसुरे व डॉ. वैभव लहाने यांनी प्रथमोपचार करून प्रकृती गंभीर असल्याने राजकुमार यास माहूरकडे रवाना केले. दरम्यान माहूर येथून उपचार करून त्यास यवतमाळ च्या शासकीय रूग्णालयाकडे पाठविले असल्याचे सांगण्यात येत  आहे.

 

    सदर घटना घडताच घटनास्थळावरील नागरीकांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रँक्टरचालकाची यथेच्छ धुलाई केली असून सिंदखेड पोलीसांनी ट्रँक्टरचालकास दहेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपचारासाठी नेले असल्याची खात्रीशीर माहीती समोर येत आहे.

 सदर घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके यांच्यासह पो. कॉ. संजय शेंडे, संघरत्न सोनसळे, मोकले आदीनी घटनास्थळाकडे धाव घेवून मृतास शवविच्छेदनासाठी वाई बाजारच्या प्राथमिक आरोग्य  केंद्रात दाखल करण्यात आले.

   याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात फिर्यादी यादव मारुती कुसराम वय 50 वर्ष रा. अंजनखेड ता माहुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. 79/2022 कलम 304(A), 279, 338 भा.द.वी. प्रमाणे ट्रॅक्टर क्रमांक MH 26 E 6643 चा आरोपी चालक माधव भीमा देवकर वय 24 वर्ष राहणार बोधडी ता. किनवट याच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी आरोपितास अटक केेेली आहे. प्रकरणाचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक भोपळे हे करीत आहेत…

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close